प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी औंध वार्ड कार्यालयात नागरिक संवाद बैठकांचे आयोजन :
पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागरिकांना उपयुक्त तसेच उच्च दर्जाच्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंटच्यावतीने, औंध वार्ड कार्यालयात ‘ नागरिक सहभाग संवाद बैठकी’चे आयोजन करण्यात आले. या बैठकीला ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, औंध वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी श्री. संदीप कदम तसेच पुणे स्मार्ट सिटीच्या औंध-बाणेर- बालेवाडी या स्थानिक क्षेत्रातील नागरिकांचे विविध गट, प्रकल्प सल्लागार, औंध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, औंध विकास मंडळ, औंध-बाणेर-बालेवाडी पाषाण विकास मंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना जगताप यांनी विविध नागरी गटांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संभाव्य तोडग्यावर सकारात्मक चर्चा केली.
नागरिकांचा सहभाग वाढवून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा संवाद बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार, २ डिसेंबर रोजी शनिवारी ११ वाजता औंध वॉर्ड कार्यालयात नागरिकांशी आज संवाद साधण्यात आला. स्मार्ट मिशनच्या ‘रस्ते पुनर्रचना प्रकल्पातंर्गत’ विकासकामे पार पडताना रस्त्याचे रुंदीकरण, पार्किंग, पदपथ इ. संबंधीची मौल्यवान निरिक्षणे यावेळी नागरिकांनी नोंदवली. त्याची सकारात्मक देखल घेत, इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) नॉर्म्स/नियमावलीला अनुसरून त्यावर योग्य पाऊले उचलण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Last modified: Friday December 15th, 2017