प्रशासन व ई- गव्हर्नन्समध्ये अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने संबंधित आयटी सोल्यूशन्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर व तत्सम अत्याधुनिक सेवा पुरवणाऱ्या घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यास पुणे स्मार्ट सिटी उत्सूक आहे.‘कॉँप्युटर अँड मीडिया डिलर असोशिएशनने (सीएमडीए)’ आयोजित केलेल्या “आयटी एक्स्पो २०१७” या प्रदर्शनात पुणे स्मार्ट सिटी सहभागी होणार आहे. दिनांक ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७’ दरम्यान हे प्रदर्शन ‘कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर’ येथे आयोजित केले जाणार आहे. नागरी सहभागाद्वारे विविध नागरी समस्यांवर विविध पर्याय शोधण्याचा पुणे स्मार्ट सिटीचा हेतू आहे. त्यासाठी अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदर्शनात सहभाग हे त्यादृष्टीने उचललेले एक स्मार्ट पाऊल आहे.
Last modified: Friday December 1st, 2017