Language:

  • English
  • मराठी

Welcome to Pune Smart City

Toll Free: 1800 1030 222

महापौरांसमवेत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची घेतली माहिती

Jan 8, 2019

Sorry, this entry is only available in Marathi. For the sake of viewer convenience, the content is shown below in the alternative language. You may click the link to switch the active language.

महापौरांसमवेत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची घेतली माहिती
पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप व सहकाऱ्यांनी विशद केले प्रकल्पाचे महत्त्व

पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांच्यासह महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. हा प्रकल्प पूर्णत्वाला आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन जानेवारी महिना अखेरीपर्यंत माननीय मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात येत आहे.
सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, वाहतूक पोलिस उपायुक्त सौ. तेजस्वी सातपुते, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस, तसेच पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मागील वर्षी बसविलेल्या १९९ वाय-फाय हॉटस्पॉट्समध्ये आणखी १०० हॉटस्पॉट्सची भर टाकण्यात आली आहे. पुणे शहरातील व्हेईकल टॅकिंग सिस्टीम, पीएमपीएमल बससेवा, पीएमसी केअर अशा विविध प्रकल्पांना इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येत आहे. त्यांच्या सेवांबाबतच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांसह अशा विविध विभागांच्या प्रकल्पांची इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.
महापौर मुक्त टिळक म्हणाल्या, “पुणे स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरला आम्ही भेट दिली. पुणे शहरात पोलिस, पीएमपीएमएल अशा विविध सेवा दिल्या जात आहेत, त्यासंदर्भातील अद्ययावत डेटा हा नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्रित करून तो प्रभावीपणे वापरून वाहतूक सुधारण्याबरोबर पुणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून स्मार्ट इलेमेंट्सचा उपयोग होईल अशी मला खात्री आहे.”
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची अंमलबजावणी हे पुणे शहराच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून संकलित करण्यात येणार डेटा भविष्यवेधी नियोजन आणि सेवा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. विविध विभागांच्या सेवांचे एकात्मीकरण (इंटिग्रेशन) केल्याने शहरातील अधिकारी, तसेच नागरिक अशा सर्व घटकांना अद्ययावत माहिती मिळण्यासाठी व नवनवीन उपाययोजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्मार्ट सिटीतील नवकल्पनांबद्दल चर्चा केली. पुणे स्मार्ट सिटीचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सध्या कामे सुरू असलेले, आगामी प्रस्तावित प्रकल्पांविषयी सादरीकरणांद्वारे उपस्थित मान्यवरांना माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराने आघाडी घेतली असून, भारतातील सर्वांत यशस्वी स्मार्ट सिटींपैकी एक असे पुणे शहराची ओळख निर्माण झाली आहे.

पुणे स्मार्ट सिटी बद्दल :
अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा,
प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे
अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे
कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद
(हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील
अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून
महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…
अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि
बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे
स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: Monday November 4th, 2019

Font Resize
Contrast