Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

‘काँप्युटर अँड मीडिया डिलर असोशिएशनने (सीएमडीए)’ आयोजित केलेल्या “आयटी एक्स्पो २०१७” चे उद्घाटन, प्रदर्शनात पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग

डिसेंबर ७, २०१७

प्रशासन व ई- गव्हर्नन्स अधिक लोकोपयोगी होण्यासाठी सीएमडीए व तत्सम घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यास पुणे स्मार्ट सिटी उत्सूक:

‘काँप्युटर अँड मीडिया डिलर असोशिएशनने (सीएमडीए)’ आयोजित केलेल्या “आयटी एक्स्पो २०१७” चे आज मा. अमृता फडणवीस, व्ही.पी. एक्सिस बँक यांच्या हस्ते उद् घाटन झाले. प्रदर्शनात पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग आहे. उद् घाटन सोहळ्याला पिंपरी चिचवड महापालिका आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डिकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, सीएमडीएचे नरेंद्र मोदी व विवेक अष्टूरकर, लॉजिटेकचे रिजनल मॅनेजर अमोल शहाणे यांची सन्माननीय उपस्थिती होती.

प्रदर्शनाचे उद् घाटन करताना मा. अमृता फडणवीस म्हणाल्या, “ सर्वांनी एकत्र येवून आयटीतील आव्हांनाचा सामना केला तर त्याचे संधीत रुपांतर होऊ शकते. बँकिंगसारखे क्षेत्र व शहरी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक आयटी सेवा उपलब्ध आहेत. मोठा बदल घडवून आणण्यासाठी या सेवा आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात उपलब्ध व्हायला हव्यात, तसेच ग्रामीण भागातही त्यांचा वेगाने प्रसार व्हायला हवा. पुणे स्मार्ट सिटीचे प्रकल्प स्तूत्य असल्याचे त्यांनी सांगितलं.

पिंपरी चिचवड महापालिका आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डिकर म्हणाले, “ अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम त्याचा व्यापाऱ्यानी स्विकार करावा लागतो. सीएमएडी त्यादृष्टीने सेवा प्रदान करत आहे. ई- कचऱ्याचे संकलन प्रक्रियेतही ते उत्तम भूमिका बजावू शकतात.”

पुणे स्मार्ट सिटीच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, “ औंध- बाणेर- बालेवाडी या स्थानिक विकास क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरु आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व औंधमध्ये तंत्रज्ञानाधारित पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवाही सुरु करण्यात आली आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटर, बिग डेटा सिस्टिममध्ये तसेच स्मार्ट सिटीची उपकंपनी पुणे आयडिया फॅक्टरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

प्रशासन व ई- गव्हर्नन्समध्ये अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने संबंधित आयटी सोल्यूशन्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर व तत्सम अत्याधुनिक सेवा पुरवणाऱ्या घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यास पुणे स्मार्ट सिटी उत्सूक आहे. त्यासाठी अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदर्शनात सहभाग हे त्यादृष्टीने उचललेले एक स्मार्ट पाऊल आहे.

Last modified: शुक्रवार डिसेंबर 15th, 2017

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट