Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

औंध-बाणेर-बालेवाडी परिसरासाठीची नागरिक सहभाग संवाद बैठक संपन्न

जानेवारी २२, २०१८

औंध-बाणेर-बालेवाडी परिसरासाठीची नागरिक सहभाग संवाद बैठक संपन्न

आगामी चार प्लेसमेकिंग प्रकल्पांच्या नाविन्यपूर्ण डिझाईनचे नागरिकांसमोर सादरीकरण

औंध-बाणेर-बालेवाडी परिसरासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची नागरिक सहभाग संवाद बैठक शनिवार २० जानेवारी २०१८ रोजी औंध वार्ड कार्यालयामध्ये पार पडली. बैठकीला औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. मनोजित बोस, मुख्य ज्ञान अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी यांनी बैठकीला संबोधित केले. पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आधारित बाणेर-बालेवाडी परिसराधील प्रस्तावित चार नवीन प्लेसमेकिंग प्रकल्पांच्या डिझाईन-संकल्पना नागरिकांसमोर चर्चा व अभिप्रायांसाठी सादर करण्यात आल्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसह सामुदायिक शेती, पुस्तकांच्या संकल्पनेवर आधारित बुकझानिया, सायन्स पार्क आणि पाळीव प्राण्यांसाठीचे पेट पार्क या चार प्लेसमेकिंग प्रकल्पांचा समावेश होता. या सर्व प्रकल्पांच्या डिझाईन्स सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत.

सद्यस्थितीतील चालू प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांनी, स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांबाबतीत समाधान व्यक्त केले.

दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पुणे स्मार्ट सिटी तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीमध्ये नागरिकांचे अभिप्राय व सूचना स्वीकारल्या जातात. औंध, बाणेर, बालेवाडी या परिसरातील नागरिकांची एकत्रित नागरिक सहभाग बैठक हि महिन्याच्या पहिल्या शानिवारी आणि औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील भागांसाठी विकेंद्रित बैठक हि दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट