Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

‘औंध-बाणेर-बालेवाडी’ स्थानिक क्षेत्रांतील विविध विकासकामांची खा. श्री. अनिल शिरोळेंकडून पाहणी

नोव्हेंबर १७, २०१७

विकासकामांशी संबंधित असणाऱ्या विविध खात्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना

पुणे स्मार्ट सिटी मिशन योजनेंतर्गत येणा-या, ‘औंध-बाणेर-बालेवाडी’ या स्थानिक क्षेत्रांतील विविध विकासकामांची खा. श्री. अनिल शिरोळे यांनी आज पाहणी केली. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. राजेंद्र जगताप व इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते. स्मार्ट सिटी मिशनमधील ‘रस्ता पुनरर्चना विकास (स्ट्रीट रिझाईनिंग)’ प्रकल्पांतर्गत येणा-या औंध येधील परिहार चौक ते डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुनरर्चना विकासकामांची शिरोळे यांनी प्रथम पाहणी केली. विकासकार्य अधिक उपयुक्त आणि लोकाभिमुख होण्यासाठी काही मौलिक सूचनाही यावेळी खा. शिरोळे यांनी केल्या. या सर्व विकासकामांत सहभागी असणाऱ्या संबंधित विविध खात्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी यावेळी केली. स्मार्ट सिटी मिशनमधील ‘प्लेस मेकिंग’ योजनेंतर्गत बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल समोरील उभारण्यात आलेल्या ‘रिन्यू’ या प्रकल्पाचीही त्यांनी आज पाहणी केली. विकासकार्य अधिक लोकोपयोगी होण्यासाठी सध्याच्या कामांत लोकसहभाग आहेच, पण तो वाढवावा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट