Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

‘काँप्युटर अँड मीडिया डिलर असोशिएशनने (सीएमडीए)’ आयोजित केलेल्या “आयटी एक्स्पो २०१७” प्रदर्शनाची सांगता

डिसेंबर १२, २०१७

प्रदर्शनातील पुणे स्मार्ट सिटीच्या स्टॉलला नागरिकांची हजारोंच्या संख्येने भेट, स्मार्ट सिटीच्या उपक्रमांविषयी जनजागृती:

पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग असलेले व ‘काँप्युटर अँड मीडिया डिलर असोशिएशनने (सीएमडीए)’ आयोजित केलेल्या “आयटी एक्स्पो २०१७” प्रदर्शनाची ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी यशस्वी सांगता झाली. या प्रर्दशनात पुणे स्मार्ट सिटीने मांडलेल्या स्टॉलला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने भेट दिली व स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. अभ्यागतांना विविध ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण, बॅनर व माहितीपत्र तसेच स्मार्ट सिटीच्या कर्मचारीवृंदाकडून प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यात स्मार्ट सिटीचे- रस्ते पुनरर्चना, स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग), लाईट हाऊस, स्मार्ट एलिमेंट या पूर्ण झालेल्या तसेच विकासकामे सुरु असलेल्या, आगामी, औंध-बाणेर- बालेवाडी स्थानिक विकास क्षेत्र व शहरातील इतर भागातील (पॅन सिटी) प्रस्तावित प्रकल्पांची माहितीही पुरवण्यात आली. स्मार्ट एलिमेंट प्रकल्पातील- पब्लिक एड्रेस सिस्टिम, एनव्हॉयरनमेंटल सेन्सर, फ्लड सेन्सर, इमर्जन्सी कॉल बॉक्सेस व वाय-फाय एक्सेस पॉईंट यांच्या प्रतिकृतींच्या माध्यमातूनही सादरीकरण करण्यात आले. वाकडमधील आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कामांची प्रशंसा केली व शहरातील इतर भागातही योजनेची अंमलबजावणी होईल, अशी आशा व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या वतीने व झूमकार PEDL च्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच औंधमध्ये तंत्रज्ञानाधारित पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवाही नुकतीच सुरु करण्यात आली आहे. त्यातील एक सायकलही स्टॉलवर ठेवण्यात आली होती. या रंगीबेरंगी लक्षवेधी सायकलीमुळे पब्लिक बायसिकल शेअरिंगसारख्या अभिनव उपक्रमाची माहिती नागरिकांना मिळाली. पुणे स्मार्ट सिटीच्या एकंदरीत कामाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्यास या प्रदर्शनाची निश्चित झाली. पाच दिवस चाललेल्या प्रदर्शनाला २० हजारांहून नागरिकांनी भेट दिली.

७ डिसेंबर २०१७ रोजी मा. अमृता फडणवीस, व्ही.पी. एक्सिस बँक यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद् घाटन करण्यात आले होते. उद् घाटन सोहळ्याला पिंपरी चिचवड महापालिका आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डिकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, सीएमडीएचे नरेंद्र मोदी व विवेक अष्टूरकर, लॉजिटेकचे रिजनल मॅनेजर अमोल शहाणे यांची सन्माननीय उपस्थिती होती.

पुणे स्मार्ट सिटीच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, “ औंध- बाणेर- बालेवाडी या स्थानिक विकास क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटर, बिग डेटा सिस्टिममध्ये तसेच स्मार्ट सिटीची उपकंपनी पुणे आयडिया फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

प्रशासन व ई- गव्हर्नन्समध्ये अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने संबंधित आयटी सोल्यूशन्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर व तत्सम अत्याधुनिक सेवा पुरवणाऱ्या घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यास पुणे स्मार्ट सिटी उत्सूक आहे. त्यासाठी अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदर्शनात सहभाग हे त्यादृष्टीने उचललेले एक स्मार्ट पाऊल आहे.

Last modified: शुक्रवार डिसेंबर 15th, 2017

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट