Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट वीकची उत्सुकता शिगेला… , पुणेकरांसाठी कला, डिझाइन, नृत्य आणि संगीत, चित्रपट आणि नाटक असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य

फेबृवारी १३, २०१९

पुणे स्मार्ट वीकची उत्सुकता शिगेला…

पुणेकरांसाठी कला, डिझाइन, नृत्य आणि संगीत, चित्रपट आणि नाटक असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य

पुणे– पुण्यात प्रथमच होत असलेल्या पुणे स्मार्ट वीकची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित पुणे स्मार्ट वीक 14 फेब्रुवारी 2019 रोजी गुरुवारपासून सुरू होत असून, यामध्ये एकूण अकरा दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. पुणे स्मार्ट वीकमध्ये “आर्ट फॉर ऑल” या घोषवाक्याच्या अनुषंगाने सर्वांसाठी कलेचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कला, डिझाइन, नृत्य आणि संगीत, चित्रपट आणि नाटक आणि इतर माध्यमांच्या क्षेत्रांमधील कार्यक्रम, कार्यशाळा, स्पर्धा आणि शिल्पकला व इतर कला स्थापना (इंस्टॉलेशन्स) असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. मंगनियार फ्युजन, भाडिपा स्टँडअप कॉमेडी आणि पंडित निलाद्री कुमार यांचा सितार फंक असे अफलातून अविष्कारांचा आस्वाद यामध्ये रसिकांना घेता येणार आहे.

पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहराच्या मध्यभागी सार्वजनिक ठिकाणे, सांस्कृतिक केंद्रे आणि उद्याने अशा ठिकाणी आयोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रत्येक पुणेकराने शहराच्या सांस्कृतिक महोत्सवासाठी एकत्र येणे, कनेक्ट होणे आणि तो साजरा करणे, सर्व वयोगटातील लोक, व्यावसायिक पार्श्वभूमी आणि आर्थिक पातळीवर एकत्र येणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. पुणे स्मार्ट वीकमधील सर्व कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत.

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप म्हणाले, “केवळ पायाभूत सुविधांतून नव्हे तर पुणे स्मार्ट सिटी सर्व स्तरांवर सामान्य नागरिकांशी कनेक्ट होऊ इच्छिते. लोक-केंद्रित या उद्देशाच्या पुढे, आम्ही 11 दिवसांच्या दीर्घ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे स्मार्ट वीकच्या या अकरा दिवसांच्या उपक्रमामध्ये 7 दिवस विशेष कार्यक्रम होणार आहेत.”

आभासी जगापासून दूर…

लोकांना त्यांच्या आभासी डिजिटल जगापासून सर्जनशील कलेद्वारे संस्कृतीच्या मुक्त ठिकाणी अवकाश मिळावे. तसेच, जेथे लोक रचनात्मक, सर्जनशील संवाद साधू शकतात अशा कार्यक्रमांना प्रोत्साहित करणे हे या आयोजनाचे एक उद्दिष्ट आहे. जंगली महाराज रोड, बाल गंधर्व, संभाजी पार्क, फर्ग्युसन कॉलेज रोड, राजा रवि वर्मा गॅलरी, घोल रोड, पोलिस परेड ग्राउंड इत्यादी शहराच्या मध्य भागात पुणे स्मर्ट वीक होत आहे.

पुणे स्मार्ट वीकमधील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे :

कला आणि डिझाइन :- राजा रवि वर्मा यांना आदरांजलीने सुरुवात. पुढे प्रतिबिंब – चित्रकारांची थेट प्रात्यक्षिके, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आर्ट आर्च फेस्टिवल, मुलांची चित्रकला स्पर्धा, श्री अच्युत पालव यांच्यासह सहयोगी कलाकार आणि विविध कलाकारांचे विचार, मुलांच्या कल्पनांचा एक कोलाज स्मार्ट पुणे, कलाकार मिलिंद मुळीक आणि ग्रूपद्वारे वॉटर कलरिंग वर्कशॉप आणि 200 हून अधिक कलाकारांसह सर्वात मोठ्या स्ट्रीट आर्ट प्रदर्शनांसाठी खुले व्यासपीठ.

चित्रपट आणि नाटक : वैशिष्ट्ये प्रशांत दामले यांचे विनोदी नाटक – एका लग्नाची पुढची गोष्ट, एक व्यंग्यपूर्ण नाटक – कॅफे अलीबाबा, विविध नाटके आणि चित्रपट दर्शविणारी ओपन-एअर थिएटर, आणि उदयोन्मुख कलाकारांसाठी खुले माइक.

नृत्य आणि संगीत : पीयूष मिश्रा, शमा भाटे, संदीप खरे, वैभव जोशी, सावनी रविंद्र, पंडित पुष्कर लेले आणि प्रतिष्ठित कलाकारांद्वारे प्रदर्शन आणि नागरिकांना थेट संगीत निर्माण करता येईल अशी एक हाय-टेक इंटरऍक्टिव्ह वाद्य भिंत.

वर्कशॉप व डेमो : विविध कलाकारांद्वारे हस्तलेखन, फोटोग्राफी, डूडलिंग, डिझाईन विचार, चित्रपट निर्मिती आणि डेमोसह अनेक कार्यशाळा.

साहित्य आणि कथा : पुणे, शिवाजी आणि व्यवस्थापन, गुहा आणि इतर स्मारक, महाराष्ट्र किल्ले इत्यादींसह विविध विषयांवरील विविध भाषांमध्ये विविध भाषिकांनी ऐतिहासिक कथा आणि ज्ञान सामायिकरण प्रेरणा दिली.

ग्रँड इव्हेंट्स : मंगनियार फ्युजन, भाडिपा स्टँडअप कॉमेडी आणि पंडित निलाद्री कुमार यांचा सितार फंकसोबत अफलातून अविष्कार.

आणि इथे आहे बरेच काही – फुलांचा उत्सव, साहित्य उत्सव आणि अन्न व शिल्प उत्सव.

म्हणून पुढील एका विलक्षण स्मार्ट वीकसाठी कनेक्टेड राहा.

Last modified: मंगळवार फेबृवारी 13th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट