Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या ‘नागरिक सहभाग संवाद बैठकी’ला औंध-बाणेर- बालेवाडी( एबीबी) स्थानिक क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग

जानेवारी ६, २०१८

पुणे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या ‘नागरिक सहभाग संवाद बैठकी’ला औंध-बाणेर- बालेवाडी( एबीबी) स्थानिक क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग

स्मार्ट सिटीच्या प्लेस मेकिंग व इतर विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना माहिती

पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्यावतीने, औंध वार्ड कार्यालयात आज दुसऱ्या ‘ नागरिक सहभाग संवाद बैठकी’चे यशस्वी आयोजन करण्यात आले.  या बैठकीला ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप व इतर अधिकारी तसेच औंध-बाणेर- बालेवाडी(एबीबी) या स्थानिक क्षेत्रातील  नागरिक व मान्यवर उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना जगताप यांनी विविध नागरी गटांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संभाव्य तोडग्यावर सकारात्मक चर्चा केली.

स्मार्ट सिटीतर्फे अंमलात येणाऱ्या ‘प्लेस मेकिंग’ या नावीण्यपूर्ण व अभिनव संकल्पनेचे सादरीकरण यावेळी नागरिकांसमोर करण्यात आले. आराखडा अंतिम टप्प्यात असलेल्या आणि आगामी काही महिन्यात आकाराला येणाऱ्या- “वरिष्ठ नागरिकांच्या सुविधांसह सामुदायिक शेती, सायन्स पार्क, बुकजानिया”- या प्लेस मेकिंग्जचे  सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनच्या ‘रस्ते पुनर्रचना प्रकल्पातंर्गत’ करण्यात येणाऱ्या विकास कामांसंबधीची मौल्यवान निरिक्षणेही नागरिकांनी यावेळी नोंदवली. त्याची सकारात्मक देखल घेत, इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) नॉर्म्स/नियमावलीला अनुसरून त्यावर योग्य पाऊले उचलण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे स्मार्ट सिटीने औंधमध्ये नुकत्याच सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा’ उपक्रमाचे यावेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. औंधमध्ये ही सेवा उपयुक्त ठरत असल्याचे सांगत बाणेर-बालेवाडीमध्येही ही सेवा सुरु करण्याविषयी नागरिकांनी विचारणा केली.

नागरिकांचा सहभाग वाढवून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी औंध, बाणेर, बालेवाडी या तिनही क्षेत्रातील नागरिकांची “एकत्र नागरी सहभाग संवाद बैठक” औंध वॉर्ड कार्यालयात आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार, २ डिसेंबर २०१७ रोजी अशा स्वरुपाच्या पहिल्या बैठकीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला होता. त्यानंतर दिनांक ६ जानेवारी २०१८ रोजी दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

औंध, बालेवाडी व बाणेर या प्रत्येक स्थानिक क्षेत्रातील नागरिकांशी अधिक उत्तमप्रकारे संवाद साधण्यासाठी या तिनही स्थानिक भागातील नागरिकांची “स्वतंत्र नागरी सहभाग संवाद बैठक” प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी त्याला आपली उपस्थिती नोंदवावी.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट