Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

फेबृवारी ११, २०१९

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

स्मार्ट ई-बस, स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर, ऑफिस राइड, स्मार्ट रस्ते, प्लेसमेकिंग साइट प्रकल्पांचे उद्घाटन

पुणे– “स्मार्ट मोबिलिटीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ई-बस, स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि ऑफिस राईड ऍप्लिकेशन अशा स्मार्ट प्रकल्पांमुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसह इतर समस्या दूर होण्यास मदत होईल,” असा विश्वास व्यक्त करीत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे शहरात विविध पायाभूत सुविधांचा स्मार्ट विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सणस मैदान येथे कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महापौर पुणे सौ. मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री श्री. दिलीप कांबळे, महापौर पिंपरी चिंववड श्री. राहुल जाधव, खासदार श्री. अनिल शिरोळे, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, सौ. मेधा कुलकर्णी, श्री. जगदीश मुळीक, पीएमपीएमएलचे संचालक श्री. सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेता श्री. श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष श्री. योगेश मुळीक, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप,महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्री. ब्रिजेश दीक्षित पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.  सौरभ राव, पिंपरी चिंववड महानगरपालिका आयुक्त श्री. श्रवण हार्डीकर, पीएमपीएमएल  अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणेकर नागरिक स्मार्ट आणि सजग आहेत. अशा स्मार्ट नागरिकांचे शहरही स्मार्ट होण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे.

स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, ऑफिस राईड अॅप्लिकेशन, स्मार्ट स्ट्रीट रिडिझाईन, प्लेसमेकिंग साईट्स, स्मार्ट स्कूल्स हे महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा प्रगत टप्पा पुणे स्मार्ट सिटीने गाठला आहे, असे पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

स्मार्ट इलेक्ट्रिक बसच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी 9 मीटर लांबीच्या नॉन-बीआरटी 25 एसी इलेक्ट्रिक बस, 12 मीटर लांबीच्या 125 बीआरटी एसी इलेक्ट्रिक बस असतील. पहिल्या टप्प्यातील २५ बसची खरेदी करण्यात आली असून त्या दाखल झाल्या आहेत.

स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्प : इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी पुणे स्मार्ट सिटी ‘पीएमपीएमएल’सोबत काम करीत आहे. पुणे स्मार्ट सिटी प्लॅननुसार इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी तसेच चार्जिंगसारख्या पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद केली आहे.

 

स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेटंर : एससीओसी हे एक उच्च दर्जाचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे जे शहरातील विविध कामकाजांची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सध्याचे स्मार्ट इलेमेंट्स आणि भविष्यातील आयटी इन्फ्रास्ट्रक्चरसह पुण्यातील विकसित स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरला संलग्न करण्याची क्षमता यामध्ये आहे.

 

ऑफिस राइड शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचे अॅपसामायिक दळणवळणाचा म्हणजेच शेअर्ड मोबिलिटीचा वापर करण्यास प्रोत्साहित करून वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यात ‘ऑफिस राइड’ मदत करेल आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कला येणाऱ्या सुमारे साडेतीन  लाख कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होईल.

 

स्मार्ट रस्ते पुनर्रचना पुणे शहराकरिता स्मार्ट सिटी प्लॅनचा एक भाग म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात रस्त्यांचे पुनर्रचना प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत रु. 300 कोटींचे सुमारे 42 किलोमीटर लांबीचे स्मार्ट स्ट्रीट करण्यात येत आहेत. यातील मिटकॉन रस्त्याचे उद्घाटन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

प्लेसमेकिंग साइट – वापरात नसलेल्या आणि अप्रयुक्त भूखंडांचा कायापालट करण्याचे काम पुणे स्मार्ट सिटीने हाती घेतले आहे. स्थानिक रहिवाशांसाठी थीम आधारित स्मार्ट शहरी स्थळनिर्मिती करण्यात येत आहे. कला आणि संस्कृती, कौशल्य विकास आणि ई-लर्निंग, नवनिर्मिती, फिटनेस इत्यादी थीम घेऊन या ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.

सायन्स पार्क – खेळकर वातावरणात विज्ञान विषयाबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी सायन्स पार्क दहा हजार चौरस फुटांवर विकसित करण्यात आले आहे.

बुकझानिया – मुलांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वाचनाची सवय लावण्यासाठी ही थीम करण्यात आली आहे. बुकझानिया प्लेसमेकिंग साइट 6500 चौरस फूट क्षेत्रफळावर विकसित केली आहे.

स्मार्ट स्कूल्स या उपक्रमा अंतर्गत, औंध-बाणेर-बालेवाडी भागातील महापालिकेच्या शाळांचे स्मार्ट स्कूल्समध्ये वेगाने रूपांतर करण्यात येत आहे. वेगवेगळ्या थीमवर आधारित अंमलबजावणीद्वारे सध्याच्या शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये त्वरित रूपांतर करणे हे उद्दिष्ट आहे.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट