Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

प्रिझन मिनिस्ट्री इंडिया व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी पीएमआय हाफ मॅरेथॉनचे आयोजन

जानेवारी ३०, २०१९

प्रिझन मिनिस्ट्री इंडिया व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी पीएमआय हाफ मॅरेथॉनचे आयोजन
पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते पीएमआय हाफ मॅरेथॉनचे विजेत्यांना पारितोषिक वितरण

पुणे: पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि प्रिझन मिनिस्ट्री इंडिया (पीएमआय) यांनी संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी नुकतेच पीएमआय हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. शहरातील लॉयोला कॉलेज ग्राऊंड येथे ही हाफ मॅरेथॉन नुकतीच पार पडली.

सुटका झालेल्या कैद्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी कर्जत येथे सुसज्ज अशा दर्जेदार कला आणि कौशल्य विकास केंद्रासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कैद्यांची सुटका, पुनर्वसन, नवजीवन याबद्दल जनजागृती करण्यासाठी तीन, पाच, दहा आणि एकवीस किलोमीटर धावण्याच्या श्रेणी पीएमआय हाफ मॅरेथॉनमध्ये होत्या.

पीएमआयचे संचालक व महाराष्ट्र फादर विलफ्रेड फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पीएमआय हाफ मॅरेथॉनमध्ये विविध विभागांमध्ये पाच हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. प्रशासनासह माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवत लॉयोला कॉलेज ग्राऊंड येथे आयोजित मॅरेथॉनला सुरवात करण्यात आली.

राज्य राखीव पोलिस दल, सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग, तसेच लॉयोला हायस्कूल, सेंट विन्सेंट, सेंट अँड्य्रूज, सेंट फेलिक्स, सेंट पॅट्रिक्स या शैक्षणिक संस्था आणि डब्लूएनएस व रुबी हॉल क्लिनिक अशा संस्थांकडून मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध प्रशासकीय विभाग, शैक्षणिक, कॉर्पोरेट व सेवाभावी संस्था यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

पुण्यातील प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना पीएमआय पुणेचे संचालक विल्फ्रेड फर्नांडिस म्हणाले, ‘कैद्यांच्या प्रश्नांबाबत जनतेच्या संवेदनशीलतेला साद घालणे आणि मुख्य प्रवाहातील त्यांची स्वीकारार्हता वाढवणे हा या मॅरेथॉनच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. पीएमआय पुणे द्वारा आयोजित पहिल्या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद पाहून आनंद झाला आणि कैद्यांना पुनर्वसन करण्यासाठी हे केंद्र उभारण्यासाठी सहयोगी समर्थन मिळण्याची आम्हाला आशा आहे.’

प्रिझन मिनिस्ट्री इंडियाचे (सीआर) फादर सॅबी म्हणाले, ‘आम्ही भावनाप्रवण आहोत आणि हे काम तुरुंग आणि शहर प्रशासनासोबत सुरू ठेवू. कैद्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आशा, प्रेम आणि क्षमा यांच्या साह्याने त्यांचे जीवन बदलून समाजात त्यांचे समाकलन करण्यासाठी सतत त्यांना सतत काम करण्यास प्रोत्साहित करणार आहोत. पीएमआय हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून संबंधित लोकांना जागरुक करण्याचा आणि कैद्यांना पुनर्वसन करण्यास मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी पुरस्कार वितरण करताना सांगितले की, “कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी अत्यंत सकारात्मक आहे आणि आमच्या विविध माध्यमांतून या कामी पाठबळ देण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहेत.”

प्रिझन मिनिस्ट्री इंडियाबद्दल
प्रिझन मिनिस्ट्री इंडिया (पीएमआय) ही एक स्वयंसेवी संस्था असून, बंगळूरमध्ये त्यांचे मुख्यालय आहे. 1986 मध्ये स्थापन करण्यात आलेली पीएमआय आज 850 शाखांमधून भारतभर 1401 तुरुंगात सेवा पुरवते. कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आशा निर्माण करण्यासाठी आणि क्षमा आणि प्रेम यांचा दृष्टीकोन विकसित करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पुण्यातील शाखेशी संबंधित स्वयंसेवकांसह तुरुंगातील अधिकारी यांच्यासह ही संस्था कार्य करते. ‘नूतनीकरण, सुधारणा आणि पुनर्वसन’ या मार्गदर्शक तत्त्वांच्या पीएमआय, पुणे संस्थेने हजारो कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचून, चांगले जीवन जगण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण केले आहे.

पुणे स्मार्ट सिटी बद्दल :
अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा,
प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे
अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे
कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद
(हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील
अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून
महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…
अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि
बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे
स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: मंगळवार जानेवारी 30th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट