Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

‘फ्लेव्हर्स ऑफ इंडिया’ने होणार ‘पुणे स्मार्ट वीक’च्या सांस्कृतिक महोत्सवाला सुरवात

फेबृवारी १३, २०१९

‘फ्लेव्हर्स ऑफ इंडिया’ने होणार ‘पुणे स्मार्ट वीक’च्या सांस्कृतिक महोत्सवाला सुरवात

पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : पुणेकर रसिकांच्या अभिरुचीस साजेशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या बहुप्रतीक्षित ‘पुणे स्मार्ट वीक २०१९’चे उद्घाटन उद्या गुरुवारी, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. माननीय श्री. जयकुमार रावळ, पर्यटन मंत्री, रोजगार हमी योजना, यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे. माननीय श्री. गिरीश बापट – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, अन्न व औषधे प्रशासन, संसदीय कार्य, महाराष्ट्र सरकार, माननीय श्री. प्रकाश जावडेकर – मानव संसाधन विकास मंत्री, भारत सरकार, माननीय श्री. दिलीप कांबळे – राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, माननीय श्री. विजय शिवतारे – जलसंपदा व जल संरक्षण राज्य मंत्री, महाराष्ट्र सरकार, माननीय श्री विशाल चोरडिया – अध्यक्ष, महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजित पुणे स्मार्ट वीकच्या उद्घाटनप्रसंगी एक अप्रतिम जोशपूर्ण नृत्य आणि संगीताचा नजराना असलेला “फ्लेव्हर्स ऑफ इंडिया” हा कार्यक्रम होणार आहे. शास्त्रीय, समकालीन आणि फ्युजन असे भारतीय वाद्य आणि नृत्य प्रकारांच्या विस्तृत श्रेणीचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे. दिलरुबा, मृदुंगम, तबला ही आणि इतर लोककलेची साधने, आणि लोक नृत्य, कथक आणि इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांचा यामध्ये समावेश आहे.

कला सर्वांसाठी हे घोषवाक्य घेऊन साजरा केला जाणारा पुणे स्मार्ट वीक अद्वितीय, दृश्यमान असा अनुभव प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून आणि तंत्रज्ञानातून कलेचा संगम घडवणारा उपक्रम आहे. विविध विषयांवरील कार्यक्रम, प्रदर्शने, कार्यशाळा, स्पर्धा, वार्तालाप, मुलांचे खेळ आणि व्हिज्युअल आर्ट्स, डिझाइन, नृत्य आणि संगीत, चित्रपट, नाटक आणि इतर माध्यमांच्या क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ याद्वारे उपलब्ध होणार आहे.

सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या जंगली महाराज रोड, बाल गंधर्व, संभाजी पार्क, फर्ग्युसन कॉलेज रोड, राजा रवि वर्मा गॅलरी, घोल रोड, पोलिस परेड ग्राउंड इ. इत्यादी ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 

Last modified: मंगळवार फेबृवारी 13th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट