Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिसेंबर ६, २०१७

उद्या ( दिनांक ७ डिसेंबर २०१७ रोजी) औंधमधील रस्त्यांवरही धावणार सामूहिक सायकली:

पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला आज विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काल महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला होता. नागरिकांमध्ये या सेवेबाबत प्रचंड उत्सुकता असून आज सकाळपर्यंत सुमारे ५०० नागरिकांनी ऑनलाईन लॉग इन करून या सेवेचा लाभ घेतला. प्रति ३० मिनिटांना १ रू. अशा नाममात्र दरात नागरिकांना सध्या ही सेवा उपलब्ध आहे. उद्या, दिनांक ७ डिसेंबरपासून औंधमध्ये ब्रेमेन चौक- परिहार चौक- आयटीआय रोड या रस्त्यावर या सामूहिक सायकली धावणार आहेत. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत उद्या सकाळी १० वाजता औंधमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (PSCDCL) वतीने व झूमकार PEDL, ओएफओच्या सहकार्याने पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचा हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याची सुरूवात दिनांक ५ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आली.

Last modified: शुक्रवार डिसेंबर 15th, 2017

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट