Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

सिटीझन एंगेजमेंट कार्यक्रमांतून सोसायट्यांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत जनजागृती अभियान

डिसेंबर १९, २०१८

सिटीझन एंगेजमेंट कार्यक्रमांतून सोसायट्यांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत जनजागृती अभियान

पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने ‘एबीबी’ परिसरातील सोसायट्यांमध्ये सिटीझन एंगेजमेंट उपक्रम

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबद्दल जनजागृती अभियानाचा भाग म्हणून विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सिटीझन एंगेजमेंट कार्यक्रम राबविण्यात येत आहे. क्लॅरियन पार्क, कुमार पद्मालय, युथिका अपार्टमेंट्स, देवी ऑर्किड येथे नुकत्याच आयोजित संवाद बैठकांना या परिसरातील आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमामध्ये सहभागी झालेले नागरिक श्री. प्रभाकर रेखडे म्हणाले, “या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.” तसेच, यामुळे स्मार्ट सिटीच्या अनेक माहीत नसलेल्या प्रकल्प व उपक्रमांबद्दल माहिती झाली असे कुमार पद्मालय सोसायटीच्या सुदेशना भट्टाचार्य यांनी  सांगितले.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांसोबत विविध विकास संकल्पनांवर थेट चर्चा घडवून आणणे हा यामागील उद्देश आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात आता या अभिनव उपक्रमाची भर पडली आहे.

औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबवण्यात येत आहे. औंधमधील सायली गार्डन सोसायटी आणि हर्ष विहार- ब सोसायटीमधून या उपक्रमाच्या पुढील टप्प्याला नुकतीच सुरवात करण्यात आली.

नागरिकांच्या सूचनांचा होतोय विचार

नवीन संकल्पना राबवण्यासाठी नागरिकांच्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी स्मार्ट सिटीचे काम पोचवून आणि त्यांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेतल्या जात आहेत. अशा प्रकारे आम्ही स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत आहोत जेणेकरून आपल्या परिसराचा, शहराचा सर्वसमावेशक विकास साधला जाईल असा यामागील विचार असल्याचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी सांगितले. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी होऊ शकतात.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “सिटीझन एंगेजमेंटच्या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत थेट पोचतो. यामुळे सर्व स्तरांतील घटकांना विकासप्रक्रियेत सहभागी करून स्मार्ट सिटीचा पाया भक्कम होत आहे. हा अभिनव उपक्रम स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पुरक ठरत आहे.”

यापूर्वी पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासोबतच जनजागृती करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने बीजगोळे निर्मितीचा उपक्रमही राबवण्यात आला होता. कम्फर्ट झोन सोसायटीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. येथील स्थानिक विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना त्यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट