Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट पुण्यास केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट’ पुरस्कार प्रदान

फेबृवारी २७, २०१९

देशातील सर्व स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद राजधानी दिल्लीमध्ये नुकतीच पार पडली. या परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने पुणे शहराला ‘बेस्ट डिजिटल पेमेंटस ऍडॉप्टर’ श्रेणीमधील `स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट २०१८’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीतील एनडीएमसी कन्वेन्शन सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्मार्ट सिटी मिशन संचालक कुणाल कुमाल, एनडीएमसीचे अध्यक्ष नरेश कुमार उपस्थित होते.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट