Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट’ प्रकल्पांना चालना देण्यासाठी नागरिकही सरसावले

डिसेंबर १, २०१७

स्मार्ट‘ प्रकल्पांना चालना देण्यासाठी नागरिकही सरसावले

स्मार्ट सिटी योजनेत नागरिकांचा सहभाग वाढवून चांगल्या दर्जाचे प्रकल्प उभारण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कॉर्पोरेशन लि.ने  सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. याचा एक भाग म्हणून औंध वॉर्ड कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या खुल्या चर्चेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नियमित मोहल्ला समितीच्या बैठक झाल्यानंतर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ‘पुणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह औंध वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी श्री. संदीप कदम यांच्यासह नागरिकांचे विविध गट, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे सल्लागार, औंध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि इतर सदस्य, औंध विकास मंडळ, औंध बाणेर बालेवाडी पाषाण विकास मंच आणि इतर मान्यवर या चर्चेत सहभागी झाले.

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा संवाद बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार, 2 डिसेंबर रोजी शनिवारी 11 वाजल्यापासून औंध वॉर्ड कार्यालयात नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. याबाबतची सूचना औंध वॉर्ड कार्यालयात लावण्यात आली असून, विविध मंडळे, संघटनांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी समूहभावना वाढीस लागावी याकरीता नागरिकांना एकत्रित आणण्यासाठी औंध व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव संघटनेचे अध्यक्ष रवि ओसवाल मांडणार आहेत. यामध्ये 20 डिसेंबर ते 10 जानेवारी 2018 या दरम्यान संगीत मैफल, मौजेचे खेळ आणि शॉपिंग महोत्सव अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व नागरिक, संघटना आणि मंडळांनी शनिवारी होणाऱ्या संवादपर बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या सूचनांचा आढावा घेऊन त्यावर नियमित प्रतिसाद मागविण्यात येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळावा यासाठी स्मार्ट सिटीच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांच्या सहभागासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला शहर सल्लागार मंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहरातील आमदार, जिल्हाधिकारी व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट