Language:

 • English
 • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी

हाराष्ट्र शासन ठराव क्र. Smartci-pune-2016/PR94/UD-23 (दिनांक: १४ मार्च २०१६) द्वारे, पुणे महानगर पालिकेसाठी विशेष उद्देश वाहनाची (SPV) स्थापना करण्यात आली. त्यानंतर २३ मार्च २०१६ रोजी पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची (PSCDCL) स्थापना करण्यात आली.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची (PSCDCL) चे नोंदणीकृत कार्यालय हे पुणे महानगर पालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे येथे आहे.

PSCDCL हे लघु आकाराची SPV आहे ज्यामध्ये सर्व विभागप्रमुखांची पदांची खुल्या बाजारातून नियुक्ती केले आहे. SPVचे कामकाज सांभाळण्यासाठी संचालक मंडळ असेल. विविध समित्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालक मंडळावरील कार्यकारी अध्यक्ष) या संचालक मंडळाला कामामध्ये सहकार्य करेल. जनसंपर्क यंत्रणा सुद्धा आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे ज्याद्वारे नागरिकांबरोबर अधिक संवाद स्थापन करण्यास मदत होईल तसेच इतर कार्यालयीन कामे मार्गी लावता येतील.

पीएससीडीसीएल ची अंमलबजावणी संरचना

Implementation structure of PSCDCL

PSCDCL साठीची SPV हि एका अर्थाने नव्या मापदंडानुसार संकल्पित करण्यात आली आहे. मोठी संस्था स्थापन करण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागप्रमुख हे सर्वसाधारण सल्लागारांकडून मदत घेतली जाईल. PSCDCL ला गरज असलेल्या विविध कामांमध्ये जसे प्रकल्पांसाठी पैसे उभे करणे आणि तांत्रिक मदत करणे यामध्ये मदत व सहकार्य करेल. सर्वसाधारण सल्लागार हे प्रत्येक विभागप्रमुखाला प्रकल्प सल्लागार किंवा अंमलबजावणी संस्था शोधण्यात व नेमणूक करण्यात मदत करेल. सल्लागार हे खुल्या बाजारातून कल्पकरित्या निधीची रचना आणि उभारणी करण्यामध्ये मदत करतील.

PSCDCL ने विविध उप-समित्या सुद्धा तयार केल्या आहेत त्यामध्ये लेखापाल समिती, नामनिर्देशन आणि मोबदला समिती, योग्य नियम लागू असलेल्या कार्यकारी समितीचा समावेश आहे. त्यानंतर PSCDCL आणि संचालक समितीचे काम सुरळीत चालण्यासाठी सु-शासनाच्या तत्त्वानुसार (Good Governance) इतर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये धोका(Risk) व्यवस्थापन समिती, कॉर्पोरेट सामाजिक दायित्त्व या स्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच नियमानुसार शहर सल्लागार गटाची स्थापना करण्यात आली आहे. विविध सहभागी संस्थांबरोबर चालणारे सहकार्याचे काम अधिक सुरळीत चालण्यासाठी हा गट काम करेल. विविध सहभागी हितसंबंधी संस्थांमध्ये जिल्हा अधिकारी, संसद सदस्य, विधान सभा सदस्य, महापौर, SPVचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्थानिक युवक, तांत्रिक विषयातील तज्ञ, आणि त्या प्रदेशातील कमीत कमी एक तज्ञ जे:

 • रहिवाशी कल्याण संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव.
 • नोंदणीकृत करदाता संघटनेचे सदस्य
 • झोपडपट्टी स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव, आणि
 • गैर-सरकारी संघटना (एनजीओ) किंवा महिला मंडली / वाणिज्य मंडळ / युवा संघटनेचे सदस्य.

SPVचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्मार्ट सिटी सल्लागार समितीचे निमंत्रक असतील.

PSCDCL मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागप्रमुख यांना कामाची अंमलबजावणी करण्यासाठीचे अधिकार दिले गेले आहेत. प्रकल्पांची कार्यवाही पुढे नेण्यासाठी विविध निरीक्षण उपसमित्यांची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. मासिक आढावा बैठका घेतल्या जात आहेत आणि कोणताही प्रकल्पाला विलंब होऊ न देण्यासाठी या बैठका महत्त्वपूर्ण आहेत.

संस्था रेखाचित्र

org chart

आमचे संचालक मंडळ

 • श्री. विक्रम कुमार, (IAS) आयुक्त, पुणे मनपा

  आयुक्त, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

  • PrincipalSecretaryGOM

   डॉ. नितीन करीर (IAS),अति.मुख्य सचिव, नगर विकास-I व अध्यक्ष

   प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि अध्यक्ष, PSCDCL

   • Murlidhar Mohol

    श्री. मुरलीधर मोहोळ,
    महापौर – पुणे मनपा

    महापौर, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

    • S Padmanabhan

     श्री. एस. पद्मनाभन (IAS- नि.)

     स्वतंत्र संचालक, PSCDCL

     • श्री. सौरभ राव, (IAS)
      विभागीय आयुक्त, पुणे

      विभागीय आयुक्त, पुणे आणि संचालक, PSCDCL

      • अमिताभ गुप्ता (आयपीएस)
       पोलीस आयुक्त, पुणे

       पोलीस आयुक्त,पुणे आणि संचालक, PSCDCL

        

        

        

       • डॉ. राजेंद्र जगताप (IDES),अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, PMPML

        अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPML) आणि संचालक, PSCDCL

        • श्री. राहुल कपूर (IAS)
         संचालक, स्मार्ट सिटीज -III

         संचालक - (स्मार्ट सिटीज - III), केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालय आणि संचालक, PSCDCL

         • Hemant_Rasane_001

          श्री.हेमंत रासने,
          अध्यक्ष-स्थायी समिती, पुणे मनपा

          अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

          • श्री. गणेश मधुकर बिडकर,
           सभागृह नेता, पुणे मनपा

           सभागृह नेता, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

           • श्रीमती दीपाली धुमाळ,
            विरोधी पक्षनेता, पुणे मनपा

            विरोधी पक्षनेता, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

            • Ravindra Hemaraj Dhangekar

             श्री. रवींद्र धंगेकर,
             नगरसेवक, पुणे मनपा

             नगरसेवक, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

             • prithviraj Sutar

              श्री. पृथ्वीराज सुतार,
              नगरसेवक, पुणे मनपा

              नगरसेवक, पुणे महानगरपालिका आणि संचालक, PSCDCL

              • डॉ. संजय कोलते, IAS मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी व SRA

               मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक, PSCDCL

               • Yashvant bhave

                श्री. यशवंत भावे (IAS – नि)

                स्वतंत्र संचालक, PSCDCL

                Comments are closed.

                फॉन्ट रिसाईझ
                कॉन्ट्रास्ट