Language:

 • English
 • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

परिसर आधारित विकास योजना

औंध-बाणेर-बालेवाडी (ABB) साठी ध्येय

भविष्यवेधी दृष्टीकोनातून जागतिक दर्जाचे राहणीमान आणि निरंतरता (sustainability) असणारे निवडक अशा औंध-बाणेर-बालेवाडी (ABB) भागामध्ये २४ असे स्मार्ट सिटी वैशिष्ट्ये तैनात करून एक आदर्श शेजारचा परिसर विकसित करण्याचे पुणे शहराचे ध्येय आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून हे करणे महत्त्वाचे आहे कारण परिसर विकासाबरोबरच २०३० पर्यंत लोकसंख्या हि चार पटीने वाढेल (४०,००० ते १,६०,०००). काही योजनाबद्ध योजनांची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • गमनशीलता (mobility): १०० ई-बस च्या माध्यमातुन सार्वजनिक वाहतूक हि १८% पासून ५०% पर्यंत पोचवण्याचे काम, बीआरटीचे २६ किमीचे मार्ग, ५४ बस स्थानकांची दुरुस्ती, २७ किमीच्या सायकल ट्रॅकच्या माध्यमातुन NMTचे प्रमाण १% पासून ८%पर्यंत वाढवणे, ६० किमी पदपथांच्या डिझाईनचे नुतनीकरण आणि स्थळांचे सुशोभीकरण
 • राहणीमान अनुरूपता (Livability): बागांच्या माध्यमातून एकूण परिसरातील खुल्या जागांचे प्रमाण ४% पासून १०% पर्यंत वाढवणे आणि ३.४ किमीचा जागतिक दर्जाचा नदीकाठ परिसर विकास
 • स्टार्ट-अप केंद्रामध्ये मिश्र वापरासाठी आणि पायी कामाला जाण्याच्या अशा ४५,००० नवीन रोजगार संधी निर्माण करणे
 • नागरिकांसाठी विविध सेवा व ई-प्रशासन यांची सुविधा असलेला एकत्रित जोडलेला ABB परिसर निर्माण करणे (ABB कार्ड, ABB ग्राहक सेवा, ९११ आपत्कालीन सेवा, संपूर्ण-परिसर Wi-Fi सेवा)

महत्त्वाच्या नियोजित योजना

विषय-कल्पना १ (Theme): लोकसंख्या चारपटीने वाढणार असल्यामुळे, स्थिर पायाभूत सुविधांना भविष्यासाठी तयार करणे (गमनशीलता, पाणी, घन कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षितता)

 • सर्व ABB परिसरामध्ये बीआरटी सेवा
 • माहिती दळणवळण तंत्रज्ञान उपाय यांनी युक्त असलेले ५४ नियमित बस-स्थानके
 • ABB परिसर व हिंजवडी मधील संपर्कासाठी सद्य अस्तित्वातील बस-सेवेला पूरक अशा १०० इलेक्ट्रिक बस
 • एक्प्रेस विमानतळ सेवा
 • ४६ किमीच्या रस्त्यांची दुरुस्ती
 • १०० ई-रिक्षांच्या माध्यमातुन सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता
 • PBS मार्फत NMTवर लक्ष केंद्रित, समर्पित असे ४२ किमीचे ट्रॅक, १५ केंद्र आणि २७ किमीचे रस्ते
 • पुण्याच्या प्रवेशद्वाराजवळ, लांब अंतराच्या बस उपलब्ध असलेले, वाहतूक केंद्र
 • दिव्यांग लोकांसाठी १००% सुलभ असे मार्ग
 • वाढती पाणी उपलब्धता (९०-१५० लिटर प्रति दिन ते २४ तास पाणी सेवा)
 • १००% स्मार्ट बल्क, व्यावसाईक आणि घरगुती मीटर्स
 • नदीलगतचा सलग ३.५ किमीचा असा भाग स्वच्छ करून पुणे शहरभरात याची पुनरावृत्ती करणे.
 • ४ खोल अशा खड्ड्यांच्या माध्यमातुन वर्षाजल पुनर्भरण
 • ABB परिसरामध्ये १०% सांडपाणी पुनर्प्रक्रिया
 • शून्य कचरा असलेला ABB परिसर विकसित करणे व कचरा ट्रकचे प्रमाण वाढवणे, RFID आधारित उपस्थिती नोंद, RFID आधारित गाड्यांची स्थळ-निश्चिती (tracking)
 • महत्त्वाच्या परिसरातून आलेल्या कॅमेरा नोंदी सतत देणारे केंद्रीभूत असे अधिकार व नियंत्रण केंद्र व पाच SWAT गाड्यांमार्फत आपत्कालीन सेवा

विषय-कल्पना २ (Theme): उच्च मानांकन असलेल्या मुलभूत सामाजिक सुविधा विकसित करणे

 • जागतिक दर्जानुसार अतिरिक्त ७६ स्वच्छतागृहांची निर्मिती आणि देखभाल
 • उंच इमारतींसह नेटक्या विकासासाठी उच्च दर्जाची अग्निशमन केंद्रे विकसित करणे
 • ७५० मोटारगाड्यांसाठी स्मार्ट पार्किंग

विषय-कल्पना ३ (Theme): पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीनंतर राहणीमान अनुरूपता (Livability) निर्देशांक वाढवणे

 • खुल्या जगातील सर्जनशीलता जोपासणे: प्रत्येक रहिवाश्याच्या पाच मिनिटाच्या अंतरावर बाग, एकूण भागापैकी खुल्या जागांचे प्रमाण ४ % पासून १०%पर्यंत वाढवणे, भाजीपाला बाजार सुरु करणे
 • परिसर अधिक चांगला करण्यासाठी १०० % भू-अंतर्गत वायरिंग करणे व मोटारगाडी विरहित रस्ते

विषय-कल्पना ४ (Theme): प्रदेशामध्ये सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक विकास करणे

 • ४०० झोपडपट्टी निवासाचा पुनर्विकास करून ABB परिसर हा १००% झोपडपट्टी-मुक्त करणे
 • झोपडपट्टीच्या चार समस्या—स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास—यावर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणणे

विषय-कल्पना ५ (Theme): प्रदेशाचा निरंतरता निर्देशांक वाढवणे

 • ३० % उर्जाबचत साध्य करण्यासाठी ८५% LED दिव्यांसह स्मार्ट पथदिवे—पथदिव्यांच्या खांबावरील स्थिर असे वायू-प्रदूषणाचे संदेश-ग्राहक, संकटकाळातील मदतीसाठीचे पॅनिक बटन, Wi-Fi सेवा बिंदू, सीसीटीव्ही कॅमेरा
 • १०० % उर्जा-पुरवठ्यासाठी ABB परिसरामध्ये स्मार्ट ग्रीड, एकूण तांत्रिक व व्यावसायिक गळती (AT&C losses) ३%नी कमी करणे
 • उर्जेच्या गरजेसाठी आवश्यक १५ % योगदान देणे

विषय-कल्पना ६ (Theme): माहिती दळणवळण तंत्रज्ञानाचा नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच ई-प्रशासनसाठी वापर

 • SPVचे कामकाज सुधारण्यासाठी डिजिटल विशेष उद्देश वाहन (SPV)द्वारे शहरातील विविध उपक्रमांसह भू-व्यवस्थापन, कर-मुल्यांकन साध्य करणे
 • E-SPV : सर्व विभागांच्या कामकाजासाठी एकत्रित असे ABBचे ऑनलाईन पोर्टल व नागरिकांसाठी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी व्यवस्था

परिसर विकास आधारित प्रकल्पांची यादी :

पुणे स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण प्रकल्पांची यादी डाउनलोड करा

Comments are closed.

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट