Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

चौथ्या बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया परिषदेत पुणे स्मार्ट सिटीला सर्वोत्कृष्ट आयसीटी उपक्रम अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार

मे १८, २०१८

पुणे स्मार्ट सिटीला सर्वोत्कृष्ट आयसीटी उपक्रम अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार!

चौथ्या बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया परिषदेत सन्मान; पुणे स्मार्ट सिटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

“सर्वोत्कृष्ट आयसीटी उपक्रम अंमलबजावणी” केल्याबद्दल पुणे स्मार्ट सिटीला राष्ट्रीय पताळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माहिती व संपर्क तंत्रज्ञानाची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल संपूर्ण भारतातून पुणे स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या चौथ्या बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया परिषदेमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या वतीने मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस यांनी मानचिन्हासह पुरस्कार स्वीकारला. यावेळी भोपाळ महापालिकेचे आयुक्त, दिल्ली आणि अहमदाबाद महापालिकेचे मुख्य कार्यकारी, येस बँकचे अध्यक्ष, एनबीयू- गुगलचे संचालक असे देशभरातील मान्यवर उपस्थित होते.

 

Last modified: गुरुवार मार्च 7th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट