Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

ग्लासांच्या रचनेतून कलाकृती साकारत वाहिली हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली

फेबृवारी २२, २०१९

ग्लासांच्या रचनेतून कलाकृती साकारत वाहिली हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली

विविध कला प्रकारांतून कलाकारांचा रसिकांशी चौफेर संवाद

पुणे : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून पुणे स्मार्ट वीक अंतर्गत फर्ग्युसन रस्त्यावर चहाच्या ग्लासांपासून तयार केलेली एक विशेष कलाकृती साकारण्यात आली. हे इंस्टॉलेशन म्हणजे देशातील शूर सैनिकांवर हिंसक दहशतवादी हल्ल्याचा थेट निषेध म्हणून कलाकृती साकारण्यात आली आहे. आदित्य शिर्के यांच्या संकल्पनेतून व इतर कलाकारांच्या सहकार्याने ही कलाकृती तयार झाली आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित पुणे स्मार्ट वीकमध्ये गुरुवारी कलाकार, व्याख्याते आणि चित्रपट निर्माते अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चौफेर संवाद साधण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळाली. तसेच, राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे चिकणमातीमध्ये मूर्ती साकारण्याचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याचा वेगळा अनुभव रसिकांनी घेतला. प्रियांका सौरभ राव यांचे प्रत्यक्ष मूर्ती यावेळी साकारण्यात आली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अतानू बिस्वास यांच्या चित्रपट निर्मिती कार्यशाळेला हौशी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सहभागी झालेल्या उत्साही पुणेकर रसिकांनी मोठ्या पडद्यासाठी पटकथा तयार करण्याचे धडे गिरविले. साहित्य संवाद महोत्सवात (लिटरेचर फेस्ट) पुणे आणि येथील पर्यावरण-पर्यटनाची संधी या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप म्हणाले, “लोकांना त्यांच्या आपल्या डिजिटल जगातून बाहेर येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध कलांच्या रसास्वादाची संधी एका उपक्रमातून उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे स्मार्ट वीक आणि जग उघडा जेथे लोक कलाची प्रशंसा करतील, सृजनशील संवाद साधतील आणि आनंद घेतील.”

“पुण्यातील सांस्कृतिक वारसाबद्दल देशभरातील लोक बोलत असतात ते पुणे स्मर्ट वीकच्या माध्यमातून पुनरुज्जीवित झाले आहे असे वाटते,” उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

“संवेदनशील समाजाची निर्मिती करण्याची, समाजाच्या दुःखावर फुंकर घालण्याची ताकद कलेमध्ये आहे. पुणे स्मार्ट सिटीचा हा एक अनोखा उत्सव आहे. यामुळे कलेला प्रोत्साहन देऊन त्याचा उत्सव हे शक्य झाले आहे, असे पीएमसीचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

बालगोपाळांच्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशनचे प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्यातील सर्व स्तरांतून रसिक पाहुण्यांनी घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा कला दालनाला भेट दिली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलेबाबतची संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘कॅच देम यंग’ या आर्ट वॉक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकार गायत्री देशपांडे यांनी सिटी प्राइड स्कूल आणि कर्नाटक हायस्कूल यांसह विविध शाळांतील मुलांना आर्ट वॉकमधून मार्गदर्शन केले.

….

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट