Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

उद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत- डॉ. राजेंद्र जगताप यांचा सल्ला केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा

फेबृवारी २६, २०१९

उद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत- डॉ. राजेंद्र जगताप यांचा सल्ला

केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा

 पुणे : “शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे अॅटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, साखर उद्योग आणि इतर अनेक उद्योगांचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेतही पुण्याचा समावेश झाला आहे. परिणामी अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अभियंत्यांनी उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करावीत व या संधींचा फायदा उठवावा,” असा सल्ला पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित केजे शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पदवीप्रदान समारंभात डॉ. जगताप बोलत होते. प्रसंगी सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक मारुती कुदळे, कॅडबरी चॉकलेटचे अजित तावडे, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखांडकी, प्रा. सुहास खोत, प्रा. हरिभाऊ फाकटकर, प्रा. निलेश उके उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे आपण ‘स्मार्टवर्क’ करण्यावर अधिक भर देत आहोत. मात्र, त्याला ‘हार्डवर्क’ची जोड असल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. मूलभूत गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. आज माहितीचा खजिना इंटरनेटवर उपलब्ध असला, तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा याचे तंत्र आपल्याला अवगत असायला हवे.”

कल्याण जाधव म्हणाले, “नाविन्यपूर्ण कल्पनेतून उद्योग उभा करण्याचा विचार केला, तर रोजगार निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेला प्राधान्य दिले पाहिजे.”

मारुती कुदळे म्हणाले, “सतत शिकण्याचा ध्यास असावा. विकासनशीलतेकडून विकसित देशाच्या वाटचालीत आपले योगदान असावे.”

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुहास खोत यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. सोनाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलेश उके यांनी आभार मानले.

 

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट