Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

ग्रॅमी विजेते प्रेम जोशुआची वन स्काय कॉन्सर्ट आणि भाटेंच्या कथकने स्मार्ट रसिक पुणेकरांची संध्याकाळ झाली सुरेल

फेबृवारी १९, २०१९

ग्रॅमी विजेते प्रेम जोशुआची वन स्काय कॉन्सर्ट आणि भाटेंच्या कथकने स्मार्ट रसिक पुणेकरांची संध्याकाळ झाली सुरेल

पुणे : फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर साकारण्यात आलेल्या विविध प्रकारच्या शिल्पकला, फोटो पॉइंट्स आणि इंस्टॉलेशन्समुळे एव्हाना पुणे शहर अधिक स्मार्ट दिसू लागले आहे. एफ.सी. रोडवर स्मार्ट पुणे या हॅशटॅगसह, टनेल ऑफ फ्युचर आणि म्युझिकल वॉलच्या इंस्टॉलेशननंतर आता वास्तुकला स्पर्धेतून पदपथावर अनेक आकर्षक कमानी साकारल्या गेल्या आहेत. आर्ट आर्च फेस्टिवल अंतर्गत समृद्ध आणि सर्जनशील संकल्पनांतून सजलेल्या या कमानी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. या रस्त्यांनी जाणाऱ्या नागरिकांमध्ये या रचना चर्चेचा विषय बनल्या आहेत.

माईर्स एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संचालक प्रा. धिमंत पांचाळ यांच्या हस्ते आर्ट आर्च फेस्टिवलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी वास्तुविशारद संजीव जोशी, कलाकार सुजाता धारप उपस्थित होते.

तसेच, कथक गुरू शमा भाटे यांच्या नृत्यसमूहाने कृष्णा- द लिबरेटर या विषयावर केलेल्या कथक सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आंतररष्ट्रीय ख्यातीचे ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार प्रेम जोशुआ, बोधी क्रांती आणि झेन व्हर्टन यांच्या वन स्काय कॉन्सर्टमधील संगीत, नृत्य आणि चित्रकलेच्या अनोख्या समांतर सादरीकरणामुळे सोमवारची संध्याकाळ अधिकच सुरेल झाली.

साहित्य महोत्सवात डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी पुण्यातील मंदिराबद्दलची दुर्मीळ माहिती सांगत श्रोत्यांना या मंदिरांचे वेगळे दर्शन घडवले. आदिती देव यांची मजेशीर डुडल आर्ट कार्यशाळेचा सर्व वयोगटांतील नागरिकांनी आस्वाद घेतला.

कलेचा उत्सव साजरा करणाऱ्या पुणे स्मार्ट आर्ट वीकचा सध्या शहरात गवगवा सुरू असून, पुणेकर रसिक प्रेक्षक या स्मार्ट वीकचा आनंद लुटत आहेत. यामध्ये 14 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होत असलेले सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी www.punesmartweek.com किंवा पुणे स्मार्ट वीक हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

या. सहभागी व्हा. साजरा करा.

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट