Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट वीकमध्ये शुक्रवारी म्युझिक वॉल, बल्लिमारान, हँड लेटरिंगचे खास कार्यक्रम

फेबृवारी १४, २०१९

पुणे स्मार्ट वीकमध्ये शुक्रवारी म्युझिक वॉल, बल्लिमारान, हँड लेटरिंगचे खास कार्यक्रम

अत्याधुनिक म्युझिक वॉलवर करा स्वतःची संगीत निर्मिती

पुणे– उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रुपरेषेसह पुणे स्मार्ट वीकचा उत्साह शुक्रवारी 15 फेब्रुवारीपासून वाढत जाणार आहे. कलाकार, कलाकार आणि कलेच्या क्षेत्रातील हौशी लोकांसाठी राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये प्रख्यात कलाकार चंदन माहीमकर यांची हँड लेटरिंगसंदर्भातील खास कार्यशाळा होणार आहे. यामध्ये केवळ पेपर आणि पेन्सिलचा वापर करून हँड लेटरिंगच्या मूलभूत गोष्टी शिकता येणार आहेत. टप्प्याटप्प्याने चंदन माहीमकर हे सहभागींना त्यांचे स्वतःचे वेगळे लेटरिंग तयार करण्यास शिकवतील आणि रचना तयार करण्यात स्वतःची शैली निर्माण करून त्यात समतोल साधण्यास शिकवणार आहेत.

 बल्लिमारान…

त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पुणेकरांना “बल्लिमारान” हे एक अत्यंत सुखद अनुभव देणारे सादरीकरण होणार आहे. देशभरातील रसिकांना त्यांच्या सशक्त गीत, सुगंधित सूर आणि आत्मा-सुखद संगीताने भारावून टाकणारे पीयूष मिश्रा यांचा हा एक आगळावेगळा प्रकल्प आहे. माझ्या कामाला, कलेला मिर्झा गालिब यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे म्हणूनच बल्लिमारान हे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले आहे, असे बहु-प्रतिभाशाली कलाकार पीयूष मिश्रा यांनी सांगितले.

 म्युझिक वॉलवर करा स्वतःची संगीत निर्मिती

तत्पूर्वी दुपारी, पुणेकर फर्ग्युसन कॉलेज रोड प्रमोनेडच्या विविध कला प्रतिष्ठापनांचे कॅलिडोस्कोप पाहू शकतात. सहभागी कलाकार आणि अभ्यागतांना स्वत:चे संगीत तयार करून त्याचा आनंद घेता येईल असे एक उच्च-तंत्रज्ञानाने सज्ज परस्पर संवादात्मक म्युझिक वॉल केले आहे.

 अशा नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका पुणे स्मार्ट वीकमध्ये 24 फेबु्रवारी 2019 पर्यंत सुरू राहील. सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत. या कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकर रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन महापौर सौ. मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

Last modified: गुरुवार फेबृवारी 14th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट