Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधीमंडळाची आज पुणे स्मार्ट सिटी कार्यालयात भेट

जानेवारी २९, २०२१

नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधीमंडळाची आज पुणे स्मार्ट सिटी कार्यालयात भेट

पुणे: नॉर्वेजियन वाणिज्य दूतावास, मुंबई येथील तीन-सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळने आज पुणे स्मार्ट सिटीला भेट दिली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री. आर्ने जान फ्ललो, वाणिज्य दूत करत होते.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, (IAS) आणि पुणे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी  विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यामध्ये आयसीटी तंत्रज्ञान,  स्मार्ट इलेमेंटस , स्मार्ट स्ट्रीट ,पायाभूत सुविधा आणि प्लेसमेकिंग प्रकल्पांसह स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी  शिष्टमंडळाला माहिती दिली. या प्रकल्पांमधील नाविन्यपूर्ण बाबी  व प्रकल्पांचे नागरिकांना होणारे फायदे सांगितले. प्रतिनिधींनी विशेषत: ई-बस प्रकल्प, मेरा थेला आणि सेफ्टीपिन आप्लिकेशन इत्यादी प्रकल्पांमध्ये उत्सुकता दर्शविली, जे नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करीत आहेत.

श्री. आर्ने जान फ्ललो यांनी सूचित केले की नॉर्वे हा विद्युत वाहनांच्या अंमलबजावणीमध्ये अग्रगण्य देश आहे आणि यासंदर्भात सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अशा प्रकारच्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि धोरणात्मक बाबी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळाने पुढे असेही सुचवले की ते विचारांचे आदानप्रदान करण्यास आणि त्यांचे अनुभव सांगण्यास दूतावास तयार आहे,  यामुळे शहरांमध्ये विविध सुविधा विकसित करण्यास मदत होईल.

दोन्ही एजन्सींमध्ये सहयोग वाढवण्याचा संकल्प करून सदरची बैठक संपन्न झाली.

Last modified: शुक्रवार जानेवारी 29th, 2021

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट