Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पीयूष मिश्रांनी संगीतातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध

फेबृवारी १७, २०१९

पीयूष मिश्रांनी संगीतातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पुणे स्मार्ट वीकमधील कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद,

शनिवारी अत्याधुनिक म्युझिकल वॉलचे खास आकर्षण

पुणे– ‘जब शहर हमारा सोता है…’, एक बगल में चाँद होगा… ‘हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत..’, ‘ना ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बाते करो’ अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है असे म्हणत पीयूष मिश्रा यांनी दहशतवादी कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानला सुनावले.

 तसेच, रसिकांकडून येणाऱ्या खास फर्माईशीनुसार काही गाणी पीयूष मिश्रा यांनी गायली मात्र, त्यांचं स्वतःचं सर्वांत आवडतं एक गाणं मात्र रसिकांनी वारंवार फर्माईश करूनही गाण्याचा मोह आवरत ते गाणं गाण्याचे टाळले. ते गाणं होतं- ‘हुसना’. या गाण्याचे बोल आहेत- ‘कहते हैं जिसको दूजा मुल्क उस पाकिस्ताँ में पहुंचे, लिखता हूँ ख़त मैं हिंदोस्ताँ से, पहलू-ए हुसना पहुंचे, ओ हुसना…’

दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तान जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत हे गाणं गाणार नसल्याचं पीयूष मिश्रा यांनी सांगितलं.

 दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यातील हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी पीयूष मिश्रा यांचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीयूष मिश्रा यांनी एक प्रकारे यातून आम्हा पुणेकरांच्या भावना व्यक्त करीत आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली, असे पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी “बल्लिमाराँ” हे पुणेकरांना एक अत्यंत वेगळ्या रसास्वादाचा अनुभव देणारे सादरीकरण ठरले. देशभरातील रसिकांना त्यांच्या सशक्त गीत, सुगंधित सूर आणि आत्मिक संगीताने भारावून टाकणारे पीयूष मिश्रा यांचा हा एक आगळावेगळा कार्यक्रम आहे. माझ्या कामाला, कलेला मिर्झा गालिब यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे म्हणूनच बल्लिमाराँ हे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले आहे, असे बहु-प्रतिभाशाली कलाकार पीयूष मिश्रा यांनी सांगितले.

 तत्पूर्वी, सकाळी राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये प्रसिद्ध हस्ताक्षर कलाकार चंदन माहीमकर यांची हँड लेटरिंगसंदर्भातील खास कार्यशाळा झाली. यामध्ये सहभागींनी केवळ पेपर आणि पेन्सिलचा वापर करून हँड लेटरिंगच्या मूलभूत गोष्टी शिकल्या. चंदन माहीमकर यांनी सहभागींना त्यांचे स्वतःचे वेगळे हस्ताक्षर तयार करण्याचे कौशल्य शिकवले आणि रचना तयार करण्यात स्वतःची शैली निर्माण करून त्यात समतोल साधण्यास शिकवले. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रुपरेषेसह पुणे स्मार्ट वीकचा उत्साह शुक्रवारी 15 फेब्रुवारीपासून वाढत आहे.

 म्युझिक वॉलवर करा स्वतःची संगीत निर्मिती

शनिवारी दुपारी, पुणेकर फर्ग्युसन कॉलेज रोड प्रमोनेडच्या विविध कला प्रतिष्ठापनांचे कॅलिडोस्कोप पाहू शकतात. सहभागी कलाकार आणि अभ्यागतांना स्वत:चे संगीत तयार करून त्याचा आनंद घेता येईल असे एक उच्च-तंत्रज्ञानाने सज्ज परस्पर संवादात्मक म्युझिक वॉल केले आहे.

 अशा नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका पुणे स्मार्ट वीकमध्ये 24 फेबु्रवारी 2019 पर्यंत सुरू राहील. सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत. या कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकर रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन महापौर सौ. मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट