Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे शहरातील रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन यंत्रणा

शहराला जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी संसाधनांची दुरुस्ती व देखभाल यांचे दिग्दर्शन, नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याची एक तांत्रिक व कार्यवाहीची पद्धती. एकूण सुमारे २००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे दोन प्रमुख टप्पे असतील.

पहिला टप्पा – माहिती संकलन आणि प्रमाणीकरण

  • रस्त्यांची यादी डिजिटल स्वरुपात संकलित करणे आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी वापरण्यात येणाऱ्या GIS स्वरुपात त्याची रचना करणे.
  • काम सुरू झाल्यानंतर वर्ष २ आणि वर्ष ३ मध्ये माहिती संकलनाची पुनरावृत्ती केली जाईल आणि त्यानुसार पहिल्या वर्षातील माहिती अद्ययावत केली जाईल.

दुसरा टप्पा – अवस्था A

  • रस्ते संपदा व्यवस्थापन यंत्रणेचा विकास- मालमत्ता व्यवस्थापनासाठीचे एक सानुकूल सॉफ्टवेअर सोल्यूशन.
  • हे सॉफ्टवेअर वापरून निरंतर सहकार्यासाठी PSCDCL / PMC विभागाच्या नामनिर्देशित व्यक्तींना प्रशिक्षण.

दुसरा टप्पा – अवस्था B

  • पदपथ व्यवस्थापन प्रणालीची निवड आणि उपयोजन

सद्यस्थिती

माहिती संकलनाची परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. ऑक्टोबर २०१७ च्या सुरवातीला रस्ते सूची सर्वेक्षणास आरंभ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या देखभालीसंबंधी पूर्वेतिहासाचा तपशील सॉफ्टवेअरमध्ये भरण्यासाठी पुणे शहरातील विविध वॉर्ड कार्यालयांतून तो गोळा करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागाच्या अभियंत्यांसोबत कार्यशाळा पार पाडल्या आहेत. डिजिटल सूचीसाठी रस्त्यांच्या जाळ्याबाबत सप्टेंबर २०१७ पासून माहिती संकलन करण्यासाठी विशेष उद्देश वाहनाच्या (एसपीव्ही) प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे. माहिती अद्ययावत करण्यासाठी टॅब ऍप्लिकेशन विकसित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील ५०० ठिकाणांवरील उपरस्त्यांच्या संरचनेची माहिती संकलित करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर आवश्यकतेची लेखी माहिती PMS सॉफ्टवेअरच्या तुलनेत तयार करण्यात आली आहे.

प्रकल्पाचे वेगळेपण

रस्ते ही एक संपत्ती म्हणून त्याच्या व्यवस्थापनाची स्वयंचलित यंत्रणा प्रस्थापित करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. निर्णयप्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा उद्देश आहे.

पूर्ण करण्याचे नियोजन

माहिती संकलन 1 वर्ष + अंमलबजावणी आणि 3 वर्षे (माहिती संकलन आणि अद्ययावत करणे)

Last modified: मंगळवार जानेवारी 23rd, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट