Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

डिजिटल अनुभव केंद्र

नागरीकरणामुळे पुणे शहर सातत्याने वाढत असल्याने या प्रक्रियेत विकास अविभाज्य घटक बनतो. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम यांचा एकत्रित असा हा स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. पुणे शहराच्या व्हिजन 2022 चे प्रतिबिंब म्हणजे डिजिचल अनुभव केंद्र आहे. वर्तमान आणि भविष्यकाळासाठी शहराच्या आराखड्याची झलक देणारे हे केंद्र आहे. हे लोकांचेच शहर असून येथील पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ करण्यासाठी मोठे बदल होणे महत्त्वाचे आहे.

सद्यस्थिती

प्रकल्प पूर्ण झालेला असून वापरण्यासाठी सज्ज आहे.

प्रकल्पाचे वेगळेपण

व्हिजन २०२२ समजावून सांगण्यासाठी लोकसहभाग केंद्राची रचना करण्यात आली आहे. पुण्याला स्मार्ट सिटी बनविण्यासाठीच्या व्हिजनमधील नियोजित वाटचाल स्पष्ट करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचा भविष्यवेध घेण्यासाठी लोकसहभागाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागरिकांसाठी शहराच्या काय योजना आहेत याची सफर हे केंद्र आपल्याला घडवते. याची अंमलबजावणी केवळ पुणेकरांच्या मदतीनेच होऊ शकते. खुले नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठीचे हे ठिकाण आहे. तसेच, शिक्षित करणे, शेअरिंग आणि प्रदर्शन हे याचे उद्दिष्ट आहे.

Last modified: सोमवार जानेवारी 15th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट