Language:

 • English
 • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट इलेमेंट्स

शहरभरातील स्मार्ट इलेमेंट्सचे नेटवर्कची पुढील उद्दिष्टे पूर्ण करण्याचे दृष्टीपथात आहे:

 • सुरक्षितता, येथे राहण्यासाठीची योग्यता वाढवून पुणे हे राहण्यासाठी अधिक चांगले शहर बनविण्यासाठी स्मार्ट सिटीचे उपक्रम हाती घेणे.
 • शहरातील प्रशासक आणि रहिवाशांची परिस्थितीजन्य जागरुकता वाढविणे.
 • प्रशासक, नागरिक, पर्यटक आणि उद्योजक यांना दैनंदिन निर्णयप्रक्रियेत मदतगार ठरेल अशी सध्याची कृतीक्षम माहिती पुरविणे.

खालील यादी ही स्मार्ट इलेमेंट्सची त्यांच्या कामाच्या व्याप्तीचा भाग आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी असलेले उद्दिष्ट आहे:

शहरातील Wi-Fiआपत्कालीन कॉल संचसार्वजनिक आवाहन प्रणाली (PAS)पर्यावरण संदेश ग्राहकपूर नियंत्रण संदेश ग्राहकचल संदेश प्रदर्शकस्मार्ट सिटी ऑपरेशन केंद्र
पुणे शहरातील नागरिकांसाठी Wi-Fi सेवा गतिशील इंटरनेट सेवा पुरवते. शहराच्या Wi-Fi चे खालीलप्रमाणे उद्देश आहेत:
 • मोफत शहरी Wi-Fi (मर्यादित वापर)
 • सशुल्क शहरी Wi-Fi
जवळपास १९९ ठिकाणी हे गतिशील इंटरनेट सेवा जोडणी उपलब्ध असून यामध्ये बागा, इस्पितळे, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालये, बस-स्थानके यांचा समावेश आहे.

आपत्कालीन कॉल संचामुळे शहरामध्ये नागरिकांची सुरक्षितता आणि नागरिक स्मार्ट सिटी संचालन केंद्र (SCOC) पासून त्यांच्याजवळून एक बटन दाबून माहिती घेऊ शकतात. ही व्यवस्था शहरभरात १३६ ठिकाणी स्थापित केलं जाईल.


यामुळे नागरी संस्थांना आपत्कालीन घटनांच्या काळात प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी किंवा त्यांच्याशी मुकाबला करणे शक्य होईल. ही व्यवस्था शहरभरात १३६ ठिकाणी स्थापित केलं जाईल.
स्मार्ट पर्यावरण संदेश-ग्राहक हे खालीलपैकी तपशील नोंदवतात:
 • तापमान
 • आर्द्रता
 • विकिरण
 • आवाज पातळी
 • हवा दर्जा निर्देशांक
हे संदेश-ग्राहक शहरामध्ये ५० ठिकाणी पर्यावरणाचे निर्देशांक मोजण्यासाठी स्थापित केले जातील.

रस्त्यावर पूर-पातळी ओळखण्यासाठी जे संदेश-ग्राहक लावले जातात, हे प्रदर्शक पद्धतीने त्या भागातील संभाव्य पूर-सदृश्य परिस्थितीची धोकादायक सूचना देतात.

हे संदेश-ग्राहक शहरामध्ये जवळपास ३० ठिकाणी(पूल आणि नाले) लावले जातील.


चल संदेश प्रदर्शक हे खालील उपयोगी माहिती पुरवते:
 • ट्राफिकची कोंडी
 • अपघाताच्या घटना
 • सध्या चालू असलेले रस्त्यांच्या कामांचे झोन
 • गती मर्यादा
 • पीएमसी कडून कोणत्याही आपत्कालीन घटना किंवा संकटाविषयी महत्त्वाच्या सूचना किंवा संदेश.
ही प्रणाली शहराच्या सर्व 161 स्थानांवर तैनात केली जाईल.
स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटरचे मुख्य उद्देश्य:

 • स्मार्ट इलेमेंट्सच्या उपकरणे, साधने, संसाधने आणि संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक केंद्रीभूत असे देखरेख आणि निर्णय केंद्र
 • एक केंद्रीभूत निर्णय केंद्र म्हणून काम करणे जे आपत्कालीन काळात एक महत्त्वाचे सुसंगती ठेवण्याचे काम करेल
 • एक केंद्रीभूत माहिती, संवाद, घटना व्यवस्थापनाचे असे पीएमसीचे केंद्र म्हणून काम करणे
 • शहरात उभे राहणारे अस्तित्त्वातील इतर व प्रस्तावित अशा इतर शासकीय नियंत्रण केंद्राच्या एकत्रीकरणासाठी एकत्रिकर्णाचे बिंदू पुरवणे.
 • स्मार्ट सिटी ऑपरेशन केंद्र हे प्रशासन आणि हितसंबंधी लोकांना खालीलप्रमाणे सहाय करेल:
  • परिणामकारक निर्णय क्षमता
  • विविध संदेश-ग्राहक (sensor) यांच्याकडून आलेली महत्त्वाची माहिती घेऊन त्याद्वारे परिणामकारक प्रशासन साधने
  • सद्य-चालू काळामध्ये विविध सूचना-अलर्टस सगळ्यांपर्यंत पोचवणे
  • आपत्कालीन किंवा संकट परिस्थितीमध्ये त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे

प्रकल्पाचे वेगळेपण

 • पुणे महापालिका किंवा पुणे स्मार्ट सिटी किंवा शहरातील इतर संस्थांनी हाती घेतलेल्या सर्व स्मार्ट उपक्रमांचे एकाग्र दृश्य मिळवून, शहर प्रशासनास दैनंदिन कामात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णयप्रक्रियेत आधार व्यवस्था म्हणून सेवा देण्यावर भर देणे हे या प्रकल्पाचे व्हिजन आहे.
 • स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटरमध्ये (SCOC) विविध विभागांनी पुरविलेल्या माहितीचा उपयोग करणे आणि शहरातील दैनंदिन आव्हानांप्रति सर्वसमावेशक प्रतिसाद यंत्रणा पुरविणे. SCOC हे एक पूर्णतः एकात्मिक, वेब आधारित उपाययोजना ठरेल ज्या माध्यमातून घटना- प्रतिसाद अखंड व्यवस्थापन, सहयोग आणि भौगोलिक – स्थानिक प्रदर्शक म्हणून सेवा दिली जाईल.
 • SCOC हे निवडक ठिकाणी पूर्णतः स्वयंचलित वातावरणात सेवांची अनुकूल देखरेख, नियमन आणि अंमलबजावणी करण्यासाठी पाहणी आणि नियंत्रण यंत्रणा पुरविणार आहे. हे स्मार्टसिटी ऑपरेशन्स सेंटरमध्ये चालक आणि संबंधित अधिकारी यांना आवश्यक प्रमाणीकरणासह (ऑथेंटिकेशन) सहज प्रवेश (accessibility) मिळेल.
 • इतर इलेमेंट्समधून जमा केलेली गोपनीय माहिती तथा डेटा वापरण्यास विविध स्मार्ट इलेमेंट्स हे सज्ज असतात. त्यामुळे अनेक नागरी सेवा अधिक कार्यक्षमपणे आणि माहितीपूर्ण पद्धतीने पुरविल्या जातात.

Last modified: गुरुवार जून 13th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट