Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

Smart Street Lighting

स्मार्ट स्ट्रीट लाईटिंग

HPSV, HPMV, T-5, फ्लड लाईट्स असे पारंपरिक ७७,८०० पथदिवे बदलून त्या ठिकाणी ऊर्जाक्षम LED लाईट लावणे. तसेच, सध्याचे मानवाधारित फीडर पॅनेल बदलून त्याजागी SCADA आधारित ऊर्जा देखरेख आणि नियंत्रण पॅनेल बसविणे.

सद्यस्थिती

एव्हाना ३०० SCADA आधारित पॅनेलसह ५७००० LED लाईट बसविण्यात येत आहेत.

प्रकल्पाचे वेगळेपण

खाजगी-सरकारी भागीदारीत (PPP) एका संस्थेने अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. फक्त एक वस्तू बदलून दुसरी बसवायची असा हा प्रकल्प नाही तर पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील नागरिकांवर कोणताही आर्थिक भार न टाकता प्रकाशनमानता (LUX) जपायची आहे. खर्चाची सर्व खबरदारी विकसक टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड हे उज्ज्वल पुणे या त्यांच्या उपकंपनीच्या माध्यमातून घेणार आहेत. एखाद्या विकसकाने ५१ टक्के बचतीचे वचन दिले आहे असे प्रथमच घडत आहे. पुणे महापालिकेला या प्रकल्पाचा सर्वप्रथम फायदा हा आहे की, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या वतीने १२ वर्षे या प्रकल्पाची देखरेख करण्यात येणार असून, यादरम्यान प्रकल्प दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा कालावधी (डाऊनटाईम) जास्तीत जास्त केवळ ४८ तास एवढा असणार आहे. पुणे महापालिकेअंतर्गत येणारे सर्व पथदिवे कमांड अँड कंट्रोल रूम येथील एकाच ठिकाणाहून नियंत्रित केले जातील. पथदिवे चालू नसतील किंवा काहीही समस्या असल्यास तेव्हा नागरिक मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन करून किंवा निशुल्क क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवू शकतात. त्यांना त्वरीत प्रतिसाद मिळाला.

प्रकल्प पूर्ण करण्याचे वेळापत्रक

प्रकल्पाची उभारणी २८ नोव्हेंबर २०१७ ला पूर्ण करण्याचे नियोजित होते. यानंतर १२ वर्षे कार्यवाही आणि देखभाल केली जाईल.

Last modified: सोमवार जानेवारी 15th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट