Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

ट्रान्झिट हब

पुण्यातील ABB परिसरातील बालेवाडी येथे अत्याधुनिक अशा वाहतूक केंद्राचा (ट्रान्झिट हब) विकास करण्यात येणार आहे. प्रस्तावित ट्रान्झिट हबमध्ये वाहतुकीच्या विविध प्रकारांचे एकीकरण करण्यात येईल. त्यामध्ये PMRDA द्वारे प्रस्तावित मेट्रो, तसेच जलदगती बस मार्ग (BRT), सिटी बसेस, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, खाजगी बसेस आणि इतर पॅरा-ट्रान्झिट सेवांचा समावेश होईल. या सुविधेद्वारे व्यापारी आणि आर्थिक उपक्रमांसाठी देखील जागा पुरविण्यात येईल. यामुळे रोजगार निर्मिती होईल.

सद्यस्थिती

हा प्रकल्प संकल्पना विकसित करण्याच्या टप्प्यात आहे.

प्रकल्पाचे वेगळेपण

या प्रकल्पाचा विकास सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर करण्याचे दृष्टीपथात आहे. तसेच, या प्रकल्पातून PSCDCL साठी महसूल निर्मिती करण्याचेही उद्दिष्ट आहे.

Last modified: मंगळवार जानेवारी 23rd, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट