पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार : स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार , इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार तसेच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार.
पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार मिळाले आहेत. स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. यापूर्वी झालेल्या सेमी फायनल स्पर्धेत या ३ प्रकल्पांना ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला आहे. नुकतीच ६९ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. ऑनलाईन मीटिंगद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने दि. २२/१२/२०२० रोजी हे ६ पुरस्कार स्वीकारले.
Last modified: गुरुवार डिसेंबर 31st, 2020