Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार

डिसेंबर २३, २०२०

पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार :  स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार , इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार  तसेच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार

पुणे: पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार मिळाले आहेत. स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. यापूर्वी झालेल्या सेमी फायनल स्पर्धेत या ३ प्रकल्पांना ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला आहे. नुकतीच ६९ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. ऑनलाईन मीटिंगद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने दि. २२/१२/२०२० रोजी हे ६ पुरस्कार स्वीकारले.

कठोर निकष व मूल्यांकनातून पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांनी  मिळवला लौकिक. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारांवर यंदा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) मोहोर उमटवली असून, पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट ई-बस ला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांनी १००+ हून अधिक सेमी फायनल प्रकल्पांमध्ये स्पर्धा करून, प्लॅटिनम व रौप्य पुरस्कार मिळवला आहे.

पुणे स्मार्ट सिटीला २०१८ मध्ये स्मार्ट सिटीसाठीचा स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला होता तसेच २०१९ मध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट क्लिनिक या प्रकल्पाला देखील स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला होता.

निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांनुसार पीएससीडीसीएलच्या कामाचे प्रमाणीकरण आणि परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे स्कॉच पुरस्कारासाठी पीएससीडीसीएलची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारांपेक्षा स्कॉच पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो, आणि पुरस्कारार्थी प्रकल्प हा वस्तुतः देशात सर्वोत्कृष्ट असल्याचे या पुरस्कारामुळे प्रमाणित होते.

‘स्टेट ऑफ गव्हर्नन्स’ या सदराखाली नुकतीच ६९ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यामध्ये स्कॉच ग्रूपच्या वतीने या निवडीची घोषणा करून पीएससीडीएसलच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार घोषित करून सन्मान देण्यात आला.

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांविषयी माहिती खालीलप्रमाणे :-

स्मार्ट ई-बस: शहरासाठी टिकाऊ वाहतुकीचे जाळे निर्माण करण्याचे आणि प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) आणि पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) ई-बस प्रकल्पाची कल्पना केली. एकूण १५० बसेस खरेदी करावयाच्या आहेत आणि आतापर्यंत १२५  हून अधिक बसेस नागरिकांच्या सेवेत आहेत.

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी): पीएससीडीसीएलचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर शहर प्रशासन आणि तिचे हितधारकांना रिअल-टाइम डेटासह माहिती योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. शहरात स्थापित 720 स्मार्ट इलेमेंटस हे महत्त्वाची माहितीचे स्रोत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी हंगामात पूर सेन्सरच्या सूचनांमुळे बचाव कार्य आणि आपत्ती पथकाच्या कामात मदत झाली. होम आयसोलेशन ट्रॅकिंग, कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग, को-मॉर्बिड सर्वेक्षण, हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोन परिभाषित करण्याच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी 15 वॉर्ड कार्यालयांसह 24×7 ऑपरेशन्सचे समन्वय करण्यासाठी आयसीसीसीला प्रमुख कोविड -१९ युद्ध कक्षात रूपांतरित केले गेले.

सेफ्टीपिन: पीएससीडीसीएलचा सेफ्टीपिन अप्लिकेशन हा एक अनोखा प्रकल्प आहे ज्यामुळे नागरिकांना शहरातील रस्ते ओळखण्यास सक्षम केले जे कोणत्याही वेळेला प्रवास करण्यास सुरक्षित असतात. सेफ्टीपिन नाईट अॅपचा वापर करून आम्ही शहरातील रस्ते 50,000 पेक्षा जास्त प्रतिमा एकत्रित करून शहरासाठी सुरक्षा मॅपिंग केले. लाइटिंग, मोकळेपणा, दृश्यमानता, गर्दी, सुरक्षा, वॉकपथ, सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता, लिंग भिन्नता आणि भावना यासारख्या मापदंडांवर आधारित सुरक्षा स्कोअर निर्माण करण्यात योगदान देणार्‍या रात्रंदिवसात स्वतंत्रपणे संग्रहित भौगोलिक ठिकाणे टॅग केलेल्या छायाचित्रांचा वापर करून 6,632 सुरक्षा ऑडिट केले.

Last modified: मंगळवार डिसेंबर 23rd, 2020

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट