Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीला प्रतिष्ठेचा स्मार्ट सिटीसाठीचा स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार

जून २२, २०१८

पुणे स्मार्ट सिटीला प्रतिष्ठेचा स्मार्ट सिटीसाठीचा स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार
कठोर निकष व मूल्यांकनातून पुणे स्मार्ट सिटीने मिळवला लौकिक
स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारांवर यंदा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) मोहोर उमटवली असून, पुण्याला ऑर्डर-ऑफ-मेरीट पुरस्कार मिळाला आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांनुसार पीएससीडीसीएलच्या कामाचे प्रमाणीकरण आणि परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे स्कॉच पुरस्कारासाठी पीएससीडीसीएलची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारांपेक्षा स्कॉच पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो, आणि पुरस्कारार्थी प्रकल्प हा वस्तुतः देशात सर्वोत्कृष्ट असल्याचे या पुरस्कारामुळे प्रमाणित होते.
नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे ‘स्टेट ऑफ गव्हर्नन्स’ या विषयावर नुकतीच ५२ वी स्कॉच परिषद पार पडली. त्यामध्ये स्कॉच ग्रूपच्या वतीने या निवडीची घोषणा करून पीएससीडीएसलला हा सन्मान देण्यात आला.

Last modified: गुरुवार मार्च 7th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट