Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचे अॅप ‘ऑफिस राइड’चे उद्घाटन

फेबृवारी १३, २०१९

शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचे अॅपऑफिस राइडचे उद्घाटन

एकात्मिक वाहतूक प्रणाली आणि मोबिलिटी इनोव्हेशन हबसाठी पुणे स्मार्ट सिटी आणि फोर्ड मोटरचा संयुक्त पुढाकार

पुणे- पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) आणि हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनच्या सहकार्याने फोर्ड स्मार्ट मोबिलिटीच्या वतीने ऑफिस राइड हा एक अॅप्लिकेशन आधारित सामायिक (शेअर्ड) मोबिलिटीचा पर्याय सादर करण्यात आला आहे.

सामायिक दळणवळणाचा म्हणजेच शेअर्ड मोबिलिटीचा वापर करण्यास प्रोत्साहित करून वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यात ‘ऑफिस राइड’ मदत करेल आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कला येणाऱ्या सुमारे साडेतीन  लाख कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होईल. ऑफिस राइड अॅप्लिकेशनद्वारे वापरकर्ते त्यांचे प्रवास नियोजन, बुकिंग आणि संबंधित वाहनाचे ट्रॅकिंग करू शकतील.

महाराष्ट्र सरकार आणि फोर्ड स्मार्ट मोबिलिटी यांच्यात असलेल्या स्टेटमेंट ऑफ इन्टेंटच्या अनुषंगानेच पुणे स्मार्ट सिटी आणि फोर्ड स्मार्ट मोबिलिटी यांच्यात झालेल्या करारानुसार नियोजित अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे. तसेच, एकात्मिक वाहतूक प्रणाली उभारण्याचा आणि मोबिलिटी इनोव्हेशन हबचा प्रस्तावही पुणे स्मार्ट सिटीच्या विचाराधीन आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुण्यामध्ये ऑफिस राइड सेवेचे आम्ही स्वागत करतो. पुण्यातील शहरी वाहतुकीपुढील आव्हाने दूर करण्यात मदत करण्यासाठी फोर्डसोबत भागीदारी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी उत्सुक आहे”.

ऑफिस राइडचे स्वागत करताना पीएससीडीसीएलचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस म्हणाले, “शहरी दळणवळणाचे निराकरण करणे हे सर्वात आव्हानात्मक समस्यांपैकी एक आहे. सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उपायांद्वारे अपेक्षित बदल घडवण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी यातील विविध प्रकारच्या पध्दतींवर कार्य करीत आहे.”

Last modified: मंगळवार फेबृवारी 13th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट