Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

डेटाप्रणित नवनिर्मितीच्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटीचा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेसोबत पुढाकार

जानेवारी ३०, २०१९

डेटाप्रणित नवनिर्मितीच्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटीचा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेसोबत पुढाकार

पुणे:- डेटावर आधारित संशोधन तथा नवनिर्मितीच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) बंगळूरस्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी औपचारिकपणे सहकार्य करार केला आहे. आयआयएससी संस्थेसोबतच्या या भागीदारीच्या माध्यमातून आगामी काळात विविध डेटा प्रणित नवनिर्मितीचे (इनोव्हेशन) उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आयआयएससी ही भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत शिक्षण आणि संशोधनासाठीची अग्रगण्य संस्था 1909 पासून कार्यरत आहे. पुणे स्मार्ट सिटीचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि शहर पातळीवरील इतर विविध अॅप्लिकेशन्समधून डेटा प्राप्त करून या संस्थेच्या सहयोगाने शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.

डेटाप्रणित विकासकामांसाठी केंद्रीय शहरी कार्ये मंत्रालयाचे इंडियन अर्बन डेटा एक्सचेंज (आययूडीएक्स) हे व्यासपीठ आहे. आययूडीएक्स आणि पुणे पोलिस व इतर विभागांसह सयुक्त विद्यमाने विशिष्ट यशस्वी प्रयोग (यूज केसेस) राबविण्यासाठी इंस्टिट्यूट ऑफ सायन्स आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या सहयोगाने हा पुढाकार घेण्यात आला आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “डेटासंबंधीच्या पुढाकारामध्ये भागीदार म्हणून आयआयएससी संस्थेची साथ लाभत आहे ही पुण्यासाठी जमेची बाजू आहे. या भागीदारीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य अशा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या क्षमतेच्या आधारे नाविन्यपूर्ण स्मार्ट प्रकल्प राबविण्यात पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशनला मोलाची मदत होईल.”

या उपक्रमाचे समन्वयक पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस म्हणाले, “ही भागीदारी पुणे स्मार्ट सिटीला डेटाच्या जोरावर विविध संधींचा लाभ घेण्यास साह्यभूत ठरेल. ‘आयआयएससी’सारख्या भागीदार संस्थांसोबत एकत्रित प्रयत्न करून उपलब्ध डेटाचे विश्लेषण करण्यात पुणे स्मार्ट सिटी सक्षम होईल, आणि त्यातून विविध विकासकामांसाठी क्रियाशील पार्श्वभूमी तयार होईल.”

शहरांच्या विकासासाठी डेटाची देवाण-घेवाण करण्यासाठी सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने “भारतीय शहरी डेटा एक्सचेंज (आययूडीएक्स)” स्थापन करण्यात आले आहे, ओपन एपीआय, डेटा मॉडेल आणि सुरक्षा, गोपनीयता आणि अकाउंटिंग यंत्रणेच्या अंतर्निहित फ्रेमवर्कवर आधारित एक पूर्णपणे मुक्त स्रोत निर्माण झाल्याने शहरी डेटाची सोपी आणि कार्यक्षम देवाण-घेवाण व्हावी हा यामागील उद्देश आहे.

 

Last modified: मंगळवार जानेवारी 30th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट