Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट यांत्रिकीकृत सफाईच्या पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ अत्याधुनिक तंत्राद्वारे अद्ययावत सफाईसाठी पुणे स्मार्ट सिटीचे पाऊल

ओक्टोबर २०, २०१८

स्मार्ट यांत्रिकीकृत सफाईच्या पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ अत्याधुनिक तंत्राद्वारे अद्ययावत सफाईसाठी पुणे स्मार्ट सिटीचे पाऊल

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट यांत्रिकीकृत सफाईचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. विद्यापीठ ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी नजीकचा बस थांबा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा वाहनाद्वारे यांत्रिकीकृत सफाईला प्रारंभ करण्यात आला. योग्य अत्याधुनिक उपकरणे वापरून रस्त्यांची साफसफाई करण्याचे आदर्श उदाहरण निर्माण करणे आणि नंतर त्याचा सर्वत्र वापर वाढविणे हा उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. अमोल बालवडकर यांच्या हस्ते या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, तसेच श्री. विजय शेवाळे, सौ. ज्योती कळमकर, सौ. स्वप्नाली सायकर, सौ. सुनिता वाडेकर हे औंध-बाणेर-बालेवाडी भागातील नगरसेवक आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त श्री. संदीप कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र जगताप यांनी म्हणाले की, “स्वच्छतेच्या बेंचमार्क मानकापर्यंत पोचण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सहयोगाने प्रगत साधनांसह सर्वोत्कृष्ट कॅरेजवे स्वच्छतेचा प्रकल्प राबवणार आहोत. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित झाले की स्वच्छतेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी मला आशा आहे. रस्ते सफाईचा हा प्रभावी आणि सक्षम मार्ग ठरेल. ”
स्मार्ट स्वीपिंग प्रकल्पाचे उद्घाटन करताना औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बलवाडकर म्हणाले, “स्मार्ट स्वीपर वाहन स्वच्छतेसाठी सेवेमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे महत्वाचे आणि उपयुक्त आहे. भविष्यवेधी दृष्टीकोनातून पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने वाटचाल करता येणार आहे. या मोहिमेमुळे औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ होईल.”
(STIHL) ही जर्मन कंपनी आणि चॅलेंजर ही उत्तर अमेरिकन कंपनी या दोन कंपन्यांच्या सहयोगाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रस्ते सफाई उद्योगात अनेक बदल झाले आहेत आणि पुणे स्मार्ट सिटी या मशीनीकृत स्वीपिंग श्रेणीमध्ये अग्रेसर राहील. या प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट साधने आणि अग्रगण्य तंत्रज्ञान वापरले जाते, त्यामुळे रस्त्यावरील स्वीपरची ही सुविधा दीर्घ काळ टिकणारी आहे.

चॅलेंजर वाहनाद्वारे हे साध्य होईल
• दुभाजक आणि पदपथासह रस्त्याची दररोज सफाई
• पार्क केलेल्या गाड्यांखालील भाग स्वच्छ करणे
• दुभाजकांचे प्रेशर वॉशिंग (दाबयुक्त सफाई)
• पदपथांचे प्रेशर वॉशिंग
• पदपथांच्या बाजूच्या भिंतींचे प्रेशर वॉशिंग
• अतिक्रमित झाडांच्या शाखांची छटाई
• अनेक ठिकाणची गवत कापणी
• अनधिकृत पोस्टर / स्टिकर काढण्यासाठी खांब, बसथांबे यांचे प्रेशर वॉशिंग.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट