Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

मलेशियात स्मार्ट सिटीज् आशिया परिषदेत पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग

सेप्टेंबर १६, २०१९

मलेशियात स्मार्ट सिटीज् आशिया परिषदेत पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग

पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने मुख्य ज्ञान अधिकारी बोस यांनी केले प्रतिनिधित्व

पुणे  – मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे 11 आणि 12 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या स्मार्ट सिटीज आशिया 2019 च्या परिषदेचा भाग होण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीला खास आमंत्रित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन मलेशियाचे गृहनिर्माण व स्थानिक शासन मंत्री वाय.बा. पूवान हजाह ज़ुरैदा कमरुद्दीन यांच्या हस्ते झाले. यावेळी कोरिया, हाँगकाँग, इंडोनेशिया, भारत आणि यजमान देश मलेशियासह जगातील विविध देशांतील स्मार्ट सिटी तज्ञ उपस्थित होते.

मलेशियाच्या पेनांग राज्याचे स्थानिक प्रशासनातील गृहनिर्माण व नगर व देश नियोजन विभागाचे लोकप्रतिनिधी वाय.बी. जगदीपसिंग देव तथा कृपाल सिंग यांनी पेनांग राज्य पेनांगला स्मार्ट स्टेट म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आपले व्हिजन यावेळी मांडले. दोन दिवसांच्या या परिषदेत सुशासन आणि नियोजन, स्मार्ट मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी, नागरी बुद्धिमत्ता आणि स्मार्ट व शाश्वत विकास यांसह स्मार्ट सिटीच्या विविध बाबींविषयी विस्तृत चर्चा झाली.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस यांना “नाविन्यपूर्णतेला आपलेसे करण्यासाठी आणि त्याचे भांडवल करण्यासाठी शहरी नेतृत्वाने काय करावे” या विषयावरील विशेष चर्चासत्रासाठी या परिषदेत आमंत्रित करण्यात आले होते. ‘डेटा आणि तंत्रज्ञान प्रणित नवनिर्मिती’ या विषयावर पुणे स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने मनोजित बोस यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

विकासात बाधा आणणाऱ्या बाबींना संधींमध्ये रुपांतरित करण्यासाठी शहरी नेतृत्व वापरू शकतील अशा प्रमुख साधनांविषयी येथे प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी शहरे स्वत: ला अधिक चांगले कसे तयार करू शकतात यावर देखील या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

Last modified: सोमवार सेप्टेंबर 16th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट