Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार, स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी

मे २९, २०१९

पुणे स्मार्ट सिटीला सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीसह दोन पुरस्कार, स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह पुणे स्मार्ट सिटीने संयुक्त विजेतेपद मिळविले. पुणे स्मार्ट सिटीच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन पुरस्कारांवर पुणे शहराने बाजी मारली आहे.

राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 22 ते 24 मे 201 9 या दरम्यान नुकत्याच संपन्न झालेल्या स्मार्ट सिटी एक्सपो 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये पुणे स्मार्ट सिटीला विजेते घोषित करण्यात आले. या पुरस्कार श्रेण्यांसाठी देशभरातील वेगवेगळ्या भागांतील अनेक शहरांची नामांकने करण्यात आली होती.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ​मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे सचिव श्री. परमेश्वरम अय्यर यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारले.

Last modified: मंगळवार मे 29th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट