Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार

सेप्टेंबर २०, २०१९

स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाचे पुरस्कार

 दोन श्रेणींमध्ये स्मार्ट पुणे विजयी, बंगळूरमध्ये होणार पुरस्कार वितरण

 पुणे : दोन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) राष्ट्रीय स्तरावर दोन ‘स्मार्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावले आहेत. स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाने आज (गुरुवार, 20 सप्टेंबर 2019) या पुरस्कारांची घोषणा केली. स्मार्ट ई-बस प्रकल्पाची निवड स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन या श्रेणीअंतर्गत करण्यात आली आहे, तर पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या पीएमसी केअर प्रकल्पाची निवड स्मार्ट नागरिक सेवा या श्रेणीत करण्यात आली आहे.

स्मार्ट उपाययोजनांच्या क्षेत्रातील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी, स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाने भारतातील सर्वाधिक नागरिकांना लाभ देणाऱ्या प्रकल्पांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामधून पुण्यातील वरील दोन प्रकल्पांची निवड झाली. बंगळुरू येथे 25 सप्टेंबर रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुण्यातील स्मार्ट ई-बस प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प ठरला आहे कारण भारतातील इलेक्ट्रिक बस प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन तो राबविणारे पुणे स्मार्ट सिटी ही पहिली स्मार्ट सिटी ठरली आहे. स्मार्ट ई-बस प्रकल्पासाठी पीएमपीएमएलसोबत पुणे स्मार्ट सिटी काम करत आहे. पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने पीएससीडीसीएलने इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या चार्जिंगसारख्या सहाय्यक पायाभूत सुविधांसाठी निधी तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येत आहे.

तसेच, पीएमसी केअर हा प्रकल्प पुणे महापालिकेच्या वतीने प्रभावी आणि प्रतिसादात्मक नागरिक केंद्रित कारभारासाठी नागरिकांच्या तक्रार निवारणाकरिता राबविण्यात येतो.

पुणेकरांनी स्मार्ट ई-बस प्रकल्प सकारात्मकपणे स्वीकारला तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांना नागरिक व्यापक पाठिंबा देत असल्याबद्दल पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे शहराचे जीवनमान उंचावण्यासाठी यापूर्वीच स्मार्ट सिटीने पाऊले उचलली आहेत. स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाच्या पुरस्कारांचा हा बहुमान मिळाला ही खरोखरच एक सन्माननीय बाब आहे. पुणे ही राष्ट्रीय स्तरावर एक आघाडीचे स्मार्ट सिटी बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची ही पावती आहे.”

स्मार्ट प्रोजेक्ट अवॉर्ड्स अशा प्रोजेक्ट्सचे प्रदर्शन व पुरस्कार देईल ज्यांनी सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये तंत्रज्ञानाचे नवीन प्रयोग दर्शविले आहेत आणि नूतनीकरणांना प्रोत्साहित करतील, समस्या सोडवण्यातील अनुभवांना प्रोत्साहन देतील, जोखीम कमी करण्यात येतील, समस्या सोडवतील आणि यशाचे नियोजन केले जातील.

………….

Last modified: शुक्रवार सेप्टेंबर 20th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट