Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

रस्त्यांच्या स्मार्ट यांत्रिकीकृत स्वच्छतेच्या पथदर्शी प्रकल्पाची यशस्वी चाचणी ‘एबीबी’ भागात अत्याधुनिक तंत्राद्वारे सफाईसाठी पुणे स्मार्ट सिटीचा पुढाकार

डिसेंबर २१, २०१८

रस्त्यांच्या स्मार्ट यांत्रिकीकृत स्वच्छतेच्या पथदर्शी प्रकल्पाची यशस्वी चाचणी, ‘एबीबी’ भागात अत्याधुनिक तंत्राद्वारे सफाईसाठी पुणे स्मार्ट सिटीचा पुढाकार

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची स्मार्ट यांत्रिकीकृत स्वच्छता करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पथदर्शी प्रकल्पासाठीची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. विद्यापीठ ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी नजीकचा बस थांबा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा वाहनाद्वारे यांत्रिकीकृत स्वच्छतेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

या पथदर्शी प्रकल्पासाठीची चाचणी औंध, बाणेर, बालेवाडी भागात पाच आठवडे घेण्यात आली. अंतिम चाचणीवेळी महापालिकेचे वाहन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. किशोर पोळ, स्वच्छता उपनिरीक्षक श्री. भोईर, तसेच चॅलेंजर स्वीपर्सचे मायरेक बायझिन्स्की, औंध-बाणेर-बालेवाडी भागातील नागरिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले की, “रस्ते स्वच्छतेच्या क्षेत्रात अलीकडे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत आणि या यांत्रिकीकृत स्वच्छतेच्या श्रेणीमध्ये अग्रेसर राहण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सहयोगाने प्रगत साधनांसह सर्वोत्कृष्ट कॅरेजवे स्वच्छतेचा प्रकल्प राबवून स्वच्छतेचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क गाठण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.”

रस्त्यावर सखोल स्वच्छता करून धूळ जास्तीत जास्त कमी करणे, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या कुंपनाच्या भिंती, दुभाजक, विजेचे खांब यांचीही स्वच्छता या यंत्राद्वारे करणे शक्य होते. तसेच रस्त्यावर वाहनांना अडथळा करणारी झुडुपे, फांद्या काढण्यासाठी खास साधनांचा यामध्ये समावेश आहे.
हा प्रकल्प स्टील (STIHL) ही जर्मन कंपनी आणि चॅलेंजर ही उत्तर अमेरिकन कंपनी या दोन कंपन्यांच्या सहयोगाने राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट साधने आणि अग्रगण्य तंत्रज्ञान वापरले जाते, त्यामुळे रस्त्यावरील स्वीपरची ही सुविधा दीर्घ काळ टिकणारी आहे. प्रशिक्षित कर्मचारी वर्गाच्या मदतीने या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी हा प्रभावी आणि सक्षम मार्ग ठरेल.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट