Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

‘पीफ’द्वारे इनोव्हेशन संस्कृती रुजविण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचा विद्यापीठाशी सहयोग करार

जानेवारी ३, २०१९

‘पीफ’द्वारे इनोव्हेशन संस्कृती रुजविण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचा विद्यापीठाशी सहयोग करार
पीफच्या माध्यमातून राबविणार इनोव्हेशन अजेंडा

पुणे- शहरात नवकल्पनांची संस्कृती रुजविण्यासाठी पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशन (पीफ) नवकल्पनांचा तथा इनोव्हेशन अजेंडा राबवत आहे. हॅकेथॉनचे यशस्वीपणे आयोजन केल्यानंतर,
स्टार्टअपच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रकल्पांची अंमलात आणण्याचे पीएफचे उद्दिष्ट आहे. त्याच्या अंमलबजावणीचे पुढील पाऊल म्हणून पीएससीडीसीएलने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेंटर ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेज तथा ‘सीआयआयएल’च्या सहयोगाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी नुकतेच यासंबंधीच्या करारावर (स्टेटमेंट ऑफ इन्टेंट) स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस आणि विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

पुण्यातील आयडिया फॅक्टरी फाउंडेशन (पीआयएफएफ) ही पीएससीडीसीएलची पूर्णपणे मालकी असलेली उपकंपनी आहे. पुणे येथे स्टार्टअप इकोसिस्टिम वृद्धिंगत करण्यासाठी आणि नवकल्पनांच्या विषयांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित अशी ही कंपनी स्थापन केली गेली आहे. यामध्ये सहभागी व्यावसायिकांना सहयोग आणि वाढीसाठी विविध संधी देऊन प्रोत्साहन आणि मजबुती देणे हा यामागील उद्देश आहे.

शहरात डेटा प्रणित नवे उपक्रम राबविण्यासाठी सहयोगी संस्थांची इकोसिस्टम निर्माण करण्याचा पुणे स्मार्ट सिटी आणि पीफचा प्रयत्न आहे. विद्यापीठासोबतची ही भागीदारी याचाच भाग आहे.
पुणे स्मार्ट सिटीने नीती आयोगाशी भागीदारीत पुण्यात एक, तसेच ऑस्टिन आणि टेक्सास या शहरांमध्ये मूव्हहॅक नावाने दोन ग्लोबल हॅकेथॉन अशा एकूण तीन हॅकेथॉन यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. नागरी प्रशासन, नागरिक सुरक्षा, आरोग्य, घन कचरा व्यवस्थापन इत्यादी शहरी प्रशासनावरील विविध विषयांवर या हॅकेथॉन्सनला लक्षणीय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि शहरी प्रशासकीय समस्यांशी संबंधित अनेक नवीन नाविन्यपूर्ण प्रारंभिक कल्पना आणि उपाय यामध्ये मांडण्यात आले.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटीसाठी इनोव्हेशन (सर्जनशीलता) हा एक महत्त्वाचा भाग असून, पुणे स्मार्ट सिटी आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाकडून विविध उपक्रम संकल्पित करण्यात येत आहेत. यातील काही सर्वोत्कृष्ट संकल्पना फलदृप व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

श्री. मनोजित बोस म्हणाले, “स्मार्ट सिटी आणि विद्यापीठातील या सहयोगामुळे उदयोन्मुख व्यावसायिकांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठबळ मिळेल. दोन्ही संस्था मिळून इनोव्हेशन केंद्रीत संधींचा पाठपुरावा केल्याने या क्षेत्राला बळ मिळेल.”

Last modified: गुरुवार जानेवारी 3rd, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट