Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट वीकमध्ये कलाकार आणि रसिकांची अनोखी देवाणघेवाण

फेबृवारी १८, २०१९

पुणे स्मार्ट वीकमध्ये कलाकार आणि रसिकांची अनोखी देवाणघेवाण

पुणे– सध्या सुरू असलेल्या पुणे स्मर्ट वीकमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, येथे रसिक म्हणून चांगल्या कला अनुभवायला मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत. हा उत्सव कलाकार आणि नागरिकांना एका पातळीवर कनेक्ट करत आहे. नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनात जे काही करता येते त्यापेक्षा पलीकडे जाण्याची चांगली संधी पुणे स्मर्ट वीकच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. इतर विविध शहरांमधून आलेले कलाकार आणि प्रतिभाशाली व्यक्तींशी संवाद साधण्याबद्दल उत्कटता नागरिकांत दिसून येत आहे. पुणे स्मार्ट वीकमध्ये आज रविवारी लिटरेचर फेस्टिवलचेही उद्घाटन करण्यात आले.

रविवारी प्रसिद्ध संगीतकार, गायक कौशल इनामदार यांच्या हस्ते म्युझिकल वॉलचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी आणि गायिका सुचित्रा इनामदार आणि अॅनिमेटर अभिजित आणि उमा नेने उपस्थित होते. विविध साधनांच्या आवाजातून संगीत निर्मिती करणारी म्युझिकल वॉल ही विलक्षण निर्मिती आहे. पुणेकर या वॉलवर त्यांचे स्वत:चे संगीत तयार करण्याचा आनंद घेत आहेत. पुणे स्मार्ट वीकमधील आवर्जून भेट द्यावीच अशी एक गोष्ट आहे.

राजा रवि वर्मा यांना आदरांजली आणि प्रतिबिंब ही दोन्ही कला प्रदर्शने खास आकर्षण आहेत. या प्रदर्शनातील काही दुर्मिळ आणि अद्वितीय चित्रे आणि पोर्ट्रेट्स म्हणजे दृश्यात्मक आनंद देणारी आहेत. प्रतिबिंब या चित्रांबद्दलच्या परिसंवादाचे उद्घाटन ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कलाकार आदित्य शिर्के यांनी पोर्ट्रेट पेंटिंगचे चित्रीकरण केले.

तसेच, नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने प्रशांत दामले यांचे रंगमंचावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे हाऊसफुल्ल गर्दीत सादर करण्यात आलेल्या “एका लगनाची पुढची गोष्ट” या नाटकातील अभिनय कौशल्यांनी प्रशांत दामलेंनी पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना भारावून टाकले.

सोमवारी (18 फेब्रुवारी), दोन सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे कार्यक्रम आहेत जे पुणे स्मार्ट वीकमध्ये सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहेत. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संध्याकाळी 6 वाजता शमा भाटे या “कृष्णा- द लिबरेटर”ची कथा कथक नृत्यातून सादर करणार आहेत. नृत्यातून आध्यात्मिक अनुभवासाठी रसिक आस्वाद घेऊ शकतात.

 

संध्याकाळी, पहिल्यांदाच प्रेम जोशुआ आणि बोधी क्रांती आणि जेन व्हर्टनचा वन स्काय हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता संभाजी पार्क येथे होणार आहे. नृत्य आणि चित्रकला यांचा एक विलक्षण संगम यात पाहायला मिळणार आहे. जेथे कला सीमा पार करते अशा प्रेक्षकांसाठी एक उत्कृष्ट अनुभव ठरणाऱ्या या जादूई कार्यक्रमाचे आयोजन पुणे स्मार्ट वीकमध्ये केले गेले आहे.

डुडल फॅक्टरीच्या अदिती देव यांची पेन इलस्ट्रेशन्स (डुडल आर्ट) वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गायत्री (गया 3) देशपांडे यांच्या “कॅच देम यंग” नावाचा आर्टवॉक फॉर किड्स देखील आयोजित करण्यात आला आहे.

लिटरेचर फेस्टिवलमध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता घोले रोडवरील नेहरू हॉल येथे भारतीय पुरातत्वशास्त्र, कला आणि वास्तुकलेतील तज्ज्ञ, एक प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता जी. बी. देगलुरकर यांचे पुण्यातील मंदिरांवर व्याख्यान आहे. त्यांना ऐतिहासिक मंदिरे आणि स्मारकांसाठी मानवी विकिपीडिया मानले जाते. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि असंख्य पुरातत्व शोध लावले आहेत.

पुणे स्मार्ट वीकचा एक भाग व्हा. www.punesmartweek.com.

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट