Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

शिमला प्रशासन पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे अनुकरण करण्यास उत्सूक, शिमला स्मार्ट सिटी प्रतिनिधींनी केला पुणे स्मार्ट सिटीचा दौरा

ओक्टोबर २२, २०१८

शिमला प्रशासन पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे अनुकरण करण्यास उत्सूक, शिमला स्मार्ट सिटी प्रतिनिधींनी केला पुणे स्मार्ट सिटीचा दौरा

पुणे : हिमाचल प्रदेशातील सर्वांत मोठे शहर आणि राजधानी शिमला येथील स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या ३६ सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा केला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आता शिमला स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानेही येथील विविध प्रकल्पांची व विकासकामांची माहिती घेतली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. शिमला महापालिकेचे उपमहापौर श्री. राकेश शर्मा आणि शिमला स्मार्ट सिटीचे सरव्यवस्थापक श्री. प्रशांत सिरसेक यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये शिमला स्मार्ट सिटीच्या विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
भारतातील सर्वांत यशस्वी स्मार्ट सिटींपैकी एक असे पुणे शहराची ओळख निर्माण झाली आहे, असे सांगत शिमलाचे उपमहापौर श्री. राकेश शर्मा यांनी पुणे स्मार्ट सिटीचे कौतुक केले.

शिमला स्मार्ट सिटीचे सरव्यवस्थापक श्री. प्रशांत सिरसेक म्हणाले, “स्मार्ट सिटीतील पथदर्शी प्रकल्पांची अमंलबजावणी पुणे स्मार्ट सिटीने अनोख्या पद्धतीने यशस्वी करून दाखवली आहे. शिमला येथे याचे अनुकरण करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरेल.”
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “आमचा स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा अनुभव ऐकण्यासाठी इतर स्मार्ट सिटींचे प्रतिनिधी येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या काही प्रकल्पांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. त्याबद्दल इतर शहरांशी संवाद साधण्यास आणि त्यांच्याकडून अभिनव कल्पना स्वीकारण्यास आम्ही उत्सूक असतो.”
या प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी नवकल्पनांबद्दल चर्चा केली. पुणे स्मार्ट सिटीचे रस्ते पुनरर्चना, प्लेस मेकिंग, पब्लिक बायसिकल शेअरिंग, कमांड अँड कंट्रोल सेंटर, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सध्या कामे सुरू असलेले, आगामी प्रस्तावित प्रकल्पांविषयी सादरीकरणांद्वारे या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पीटलसमोरील ‘रिन्यू व एनर्जाईज’ या दोन ‘प्लेस मेकिंग’ साईट्स आणि विविध पथदर्शी प्रकल्पांना भेटी देऊन त्यांनी त्याबाबत माहिती घेतली.

पुणे स्मार्ट सिटी बद्दल :
अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा,
प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे
अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे
कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद
(हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील
अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून
महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…
अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि
बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे
स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: सोमवार ओक्टोबर 22nd, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट