स्मार्ट सिटीची निवड
प्रत्येक शहर या निवडीसाठी ‘शहर आव्हान (City Challenge’) यामधील स्पर्धेमध्ये भाग घेतात. या निवड पद्धतीमध्ये दोन टप्पे आहेत. संबधित मुख्य सचिवाला याबाबतीतला क्रमांक सूचित केल्यानंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश खालील पावले उचलतील:
पहिला टप्पा: राज्याद्वारे शहरांची निवड
सुरुवातीला, या संदर्भातील मुलभूत अटींची पूर्तता झाल्यानंतर आणि त्यासाठीच गुण-पत्रक निश्चित झाल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या परिसरातील संभाव्य स्मार्ट शहरांची निवड करतील. पूर्वनिश्चित तारखेआधी राज्य व केंद्रशासित प्रदेश हे या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या शहरांची यादी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडे पाठवली. महाराष्ट्रासाठी निवडलेल्या एकूण दहा शहरांमध्ये नवी मुंबई, मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे यांचा समावेश आहे.
दुसरा टप्पा: निवडीसाठी आव्हान फेरी (Challenge Round)
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संभाव्य १०० शहरांच्या यादीतील प्रत्येक शहराने ‘City Challenge’ मध्ये सहभागी होण्यासाठी आपापले प्रस्ताव तयार केले. प्रत्येक शहराने यासाठी आपली एक ध्येयदृष्टी (Vision), ध्येय (Mission) योजना (Plan) तयार केल्या. त्या शहरांच्या संकल्पनांमध्ये या त्या त्या शहरातील संदर्भ, साधन-संपत्ती आणि नागरिकांच्या प्रथामिकतांचे प्रतिबिंब पडले. प्रत्येक शहराने संपूर्ण शहरासाठीचे आणि परिसर केंद्रित असे प्रस्ताव विकसित केले. निवड झालेल्या स्मार्ट सिटींनी आपापले प्रस्ताव १५ डिसेंबर २०१५ रोजी सादर केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांचे मुल्यांकन
या सर्व प्रस्तावांचे राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय तज्ञ, संस्था आणि संघटना यांचा समावेश असलेल्या समितीने मुल्यांकन केले. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये यासंदर्भातील २० सर्वोत्तम शहरांचे प्रस्ताव घोषित होणार होते. ज्या शहरांची या टप्प्यामध्ये मध्ये निवड झाली नाही त्यांनी त्यांचे प्रस्ताव दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची तयारी सुरु करतील. २८ जानेवारी २०१६ रोजी केंद्रीय नगर विकास विभागाने पहिल्या फेरीतील विजेते घोषित केले. पहिल्या फेरीमध्ये केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या २० शहरांच्या यादीमध्ये पुण्याची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली.
स्मार्ट सिटीजच्या निवडीतील विविध पावले खाली दिली आहेत:

पुणे शहराच्या निवडीची प्रक्रिया
नागरिक सहभाग
pभारतीय शहरांच्या इतिहासामध्ये पुणे शहराने आतापर्यंत कदाचित सर्वात मोठ्या अश्या सल्ला-मसलतीच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांशी संवाद साधला. २४ तास/आठवडा या पातळीवर हे केंद्र समाज माध्यामांसकट या चर्चेची पाहणी व नोंद करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुण्याच्या नागरिकांकडून प्राप्त झालेल्या मतांची, अभिप्रायांची, संकल्पना आणि सूचनांची संख्या ३५ लाखाच्या वर आहे.नऊ टप्प्यांमध्ये हा नागरिक सुसंवाद आराखडा रचण्यात आला होता. यामधील पाच टप्पे हे संपूर्ण शहर विकासाच्या मुद्द्यावर आणि चार टप्पे हे परिसर आधारित विकासावर केंद्रित होत्या. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
- पॅन सिटी विकास: संपूर्ण शहर विकास: पाच टप्प्यांमध्ये आखलेला कार्यक्रम:
अ) Envision (१७ ते २८ सप्टेंबर)-महत्त्वाच्या मुद्द्यांची, विषयांची निवड;
आ) Diagnose (२८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर)- प्राथमिकता निश्चित झालेल्या क्षेत्रांमधून ध्येयनिश्चिती करणे;
इ) Co-Create (१३ ते २३ ऑक्टोबर)-प्राथमिकता निश्चित झालेल्या समस्यांवर निश्चित उत्तरे;
ई) Refine (२३-२८ ऑक्टोबर)-नागरिकांच्या अभिप्रयानंतर लघु-प्रयोगशाळांमध्ये शुद्धीकरण आणि
उ) Share (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर)-अभिप्रायांसाठी उत्तरांचा शेवटचा संच . - संपूर्ण शहर विकास: पाच टप्प्यांमध्ये आखलेला कार्यक्रम:
अ) Explore (नागरिकांचे सर्वेक्षण);
आ) Syndicate (जनप्रतिनिधी मार्फत);
इ) Learn (नागरिकांशी सल्ला-मसलत) आणि
ई) Design (नागरी नियोजनकारांबरोबर संवाद). - पुणे शहराने “5-S” संकल्पनेचा उपयोग:
अ) Speed (काटेकोर १०० दिवसांची प्रक्रिया)
आ) Scale (५०% नागरिकांपर्यंत संपर्क)
इ) Structure (फेरीनिहाय पद्धती)
ई) Solutionning (उत्तरे शोधण्यासाठी व्यापक जनसहभाग)
उ) सामाजिक लेखापरीक्षण: नागरिक सिंडिकेशन
नागरिक सहभागाच्या प्रयत्नांचा सारांश

आर्थिक परिव्यय
