Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट SPV 2018 पुरस्कार

मे २५, २०१८

स्मार्ट पुण्याला ३ राष्ट्रीय पुरस्कार- पथदिवे यंत्रणा, स्मार्ट SPV आणि पाणी पुरवठा योजनेची दखल

 राजधानी दिल्लीत स्मार्ट सिटीज् इंडिया ऍवॉर्ड्समध्ये सन्मान; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ही बातमी पुणेकर नागरिकांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पुणे महानगरपालिकेने तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत स्मार्ट इंडिया सिटीज् ऍवॉर्ड्स या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तीन वेगवेगळ्या स्मार्ट प्रकल्पांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी एक्झिबिशन इंडिया ग्रूपचे चेअरमन श्री. प्रेम बहल यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारले.

देशात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटीज् इंडिया ऍवॉर्ड्समध्ये तीन विभागांमध्ये देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये पुणे स्मार्ट सिटी आघाडीचे विजेते ठरले. ऊर्जा पुरस्कारांच्या विभागात स्काडा यंत्रणेशी एकात्मिक केलेल्या स्मार्ट एलईडी पथदिवे यंत्रणा, तसेच स्मार्ट एसपीव्ही (विशेष उद्देश वाहन संस्था) या विभागात आणि पाणी प्रकल्पांच्या विभागामध्ये पुण्याच्या पाणी पुरवठा प्रकल्पाने बाजी मारली.

Last modified: गुरुवार मार्च 7th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट