Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

ध्येयदृष्टी

मृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेल्या पुणे शहराचा येथे वावर असलेल्या उत्कृष्ट अशा मनुष्य बळ आणि प्रगतीशील व्यावसायिक वातावरण या गोष्टींच्या जोरावर भारतातील गुणात्मक दृष्ट्या ‘जगण्यासाठी सर्वात योग्य शहरांपैकी एक’ असा नावलौकिक कमावण्याचा मानस आहे. यासाठी भविष्यवेधी दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी करताना आणि पर्यावरण अनुकूल, हरित व सुंदर अश्या परिसराची घडण करण्यासाठी पुणे शहर प्रयत्न करत आहे.

पुणे स्मार्ट सिटी मिशन – काही संकल्पना:

  • विस्तृत अशा नागरिक सहभाग कार्यक्रमातून नागरिकांच्या खऱ्या गरजा आणि त्यांचे प्रतिसाद निश्चित करणे. त्यासाठी पुणे शहराने कल्पक अश्या नऊ टप्प्यातील प्रक्रिया ठरवली आहे. हि प्रक्रिया या प्रकारची जगातील एक अनोखा प्रयोग ठरला आहे. या माध्यमातून शहराच्या ५० टक्क्यांपर्यंत हा संवाद नेण्याचा प्रयत्न आहे.
  • ‘कमी मधून भरपूर’ याप्रकारच्या उत्तरांवर लक्ष केंद्रित- ज्या प्रकारच्या कार्यक्रमांमधून प्रचंड प्रभाव पडेल आणि सेवेची-सुविधांची गुणवत्ता वाढेल त्या प्रकारच्या किफायतशीर कल्पनांवर काम
  • स्वताच्या संसाधनांतून निधी उभारणाऱ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून याद्वारे स्वावलंबी होण्यासाठी आणि तसेच राज्य व केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून राहण्याची तयारी करणे.
  • किफायतशीर खर्चाच्या माहिती तंत्रज्ञान आधारित समस्या-उत्तरे (सोल्युशंस) पायाभूत सुविधा कशा सुधारता येतील.
  • अंमलबजावणीची संभाव्यता, त्याची व्यवहार्यता आणि प्रभाव याचा विचार करून बनवलेले प्रस्ताव आणि योजना.

वर उल्लेख केलेल्या विशेष गुणांवर आधारित पुणे स्मार्ट मिशनचे काम पुढे चालेल. यासंदर्भातील SPVस्थापन करण्यासाठी आणि स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होईल.

स्मार्ट सिटी प्रस्ताव (SCP) मध्ये परिसर विकास आणि संपूर्ण शहरांसाठीच्या मुद्द्यांची अंमलबजावणी करन्यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे.

Comments are closed.

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट