स्मार्ट सिटी म्हणजे काय
या प्रकारच्या अभियानातील शहरांचे मार्गदर्शन करण्यासाठी काही व्याख्यांची मर्यादा निश्चिती करणे आवश्यक असते. कोणत्याही शहरी रहिवाशाच्या कल्पनेनुसार स्मार्ट सिटीच्या संकल्पना चित्रामध्ये तिच्या किंवा त्याच्या आशा-आकांक्षांना प्रतिबिंबित करणाऱ्या पायाभूत सुविधा व सेवा यांचा समावेश असतो. शहरी भागातील नागरिकांच्या गरजा आणि आशा-आकांक्षांना लक्षात घेऊन नगर नियोजनकार हे संपूर्ण शहराची नागरी-परिसंस्थेचा विकास करण्याचे ध्येय समोर ठेऊन शहरांचा एकात्मिक विकास करण्साठी काम करतात. त्यासाठी हे नियोजनकार शहरांमध्ये संस्थात्मक, भौतिक, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास हे प्रमुख स्तंभाचा विकास करण्याकडे लक्ष देतात.